Sonali Phogat Twitter
गोवा

Sonali Phogat Case|गोवा पोलिसांचे एक पथक आज हरियाणाला रवाना होणार

अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी एएनआयला दिली.

दैनिक गोमन्तक

गोवा: सोनाली फोगट खून प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस निरीक्षक थेरॉन डी’कोस्टा आणि पीएसआय फ्रान्सिस यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांचे एक पथक आज हरियाणाला रवाना होईल अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी एएनआयला दिली.

(A team of Goa Police will leave for Haryana today for sonali phogat case)

मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी व्हावी, हरियाणा Govt चे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी हरियाणा सरकारने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. सोनाली फोगट यांच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे हरियाणा सरकारने म्हटले आहे. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी लेखी अर्ज दिला.

गोव्यातील कर्लिस बार अखेर ‘सील’

राज्यात अमलीपदार्थामुळे वादग्रस्त ठरलेला ‘कर्लिस बार’ काल सोमवारी अखेर सिल करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. दरम्यान, सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी गोवा पोलिसांनी उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाचजणांचे पथक तयार केले असून ते आज हरियाणातील हिस्सारकडे रवाना होणार आहे. हे पथक फोगट यांच्या मुळ गावी हिस्सार आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहे. याशिवाय सोनाली यांच्या कुटुंबियांसह इतरांच्या साक्ष आणि जबाब नोंदवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT