A student from Margao drowned in a lake and died unfortunate Dainik Gomantak
गोवा

मडगाव मधील विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्‍यू

मुलगा तळ्याकडे कसा पोहोचला याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही

दैनिक गोमन्तक

मडगाव : बेताळभाटी येथे तळ्यात बुडल्याने एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. हा मुलगा काल घरातून बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह तळ्यात सापडला. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरू करण्‍यात आली. तो मुलगा तळ्याकडे कसा पोहोचला याचे गूढ अजून उलगडलेले नाही. या प्रकरणी कोलवाचे पोलिस उपनिरीक्षक अजित वेळीप अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आज बोरी येथील जुन्या पुलाच्या खाली झुवारी नदीच्या पात्रात फातोर्डा-मडगाव येथील एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज (शनिवारी) दुपारी आढळला. माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. विद्यार्थ्याचे नाव आर्यन राजेंद्र बरड (18) असे असून तो मठरस्ता घोगळ-फातोर्डा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा बारावीत शिकत होता व पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा असल्याने तो तणावाखाली होता. आज सकाळी तो घरातून गायब झाल्याचे निदर्शनास येताच बरड कुटुंबीयांची धावपळ उडाली. आर्यनचा सगळीकडे शोध घेण्यात आला, पण तो सापडला नाही. दुपारी त्याचा मृतदेह बोरी येथे पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फोंडा (Ponda) पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह चिकित्सेसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

PM Modi Saudi Arabia Visit: पीएम मोदींच्या जेद्दाह दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; दोन दिवसांच्या हॉटेल बिलाचा आरटीआयमधून खुलासा

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT