Baga Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Baga Accident: भरधाव कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले; बागा येथे खांबावर आदळली कार

गंभीर जखमी नाही; कारचे मोठे नुकसान

Akshay Nirmale

Baga Accident: गोव्यातील बागा बीच येथे मुख्य रस्त्यावर सोमवारी दुपारी एका कारचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ही कार शेजारील जाहीरातीच्या लोखंडी खांबावर आदलळी.

यात हा खांब गाडीचे डाव्या बाजूचे चाक आणि कारचे बॉनेट यांच्यात घुसला आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या अवस्थेवरून कार किती वेगात होती ते लक्षात येऊ शकते.

कार या खांबात अडकल्याने थांबली अन्यथा खांबाला धडकून ती पुटपाथवर चढली असती तर मोठे नुकसान झाले असते. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: कळंगुट हल्ला प्रकरण: आरोपी पवारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT