Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वाहनचालकांनो...पोलिसांची करडी नजर; 'सुरक्षा महत्त्वाची' म्हणत विशेष मोहीम, एकाच दिवसात ऐवढ्या चालकांना दणका

Goa Traffic Police: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाला सामोरं जावं लागेल, वाहनचालकांना दंड आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी सर्व वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police

पणजी: गोव्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. गोवा वाहतूक पोलिसांनी एक्स (X) या सोशल मीडिया हॅण्डलचा वापर करून मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली.

भरधाव वेगाने गाडी चालवणे, दारू किंवा ड्रग्सचे सेवन करून गाडी चालवल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात अपघातांचा आकडा वाढत चाललाय. यावर कायमचा आळा बसवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाला सामोरं जावं लागेल अशी सूचना जारी केली आहे.

सोबतच त्यांनी वाहनचालकांना दंड आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी सर्व वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन करण्याचा आदेश दिलाय. सोमवारी (दि. २१ ऑक्टोबर) रोजी पोलिसांनी ६५८ चालकांना चलन देण्याबरोबरच केवळ एका दिवसात १५२४ वाहन चालकांच्या नावे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली आहे.

राज्यात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक अपघात होत असल्याची माहिती समोर आलीये. वाढते अपघात आणि यामुळे होणारे मृत्यू हा गंभीर विषय लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या दोन दिवसांत रस्ता अपघातात दोघाजणांनी जीव गमावला असून यामधील एका अपघातात चारचाकी चालक अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत होता तर दुसऱ्या अपघातात ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने ट्रकखाली गेलेल्या महिलेने जागीच प्राण सोडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

IPL 2026: मुंबई इंडियन्स, हैदराबाद... 'या' 4 संघांचं 'प्लेऑफ'मधील स्थान पक्कं; दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

झाडेझुडपे तोडून हजारो प्लॉट, शेकडो फ्लॅट, क्लब आणि कृत्रिम बीच; म्हणून कारापूर-सर्वण प्रकल्पास स्थानिकांचा विरोध..

Goa Murder Case: गोवा फिरायला आला अन्... कळंगुटमध्ये पर्यटकाची चाकूने भोसकून हत्या, कॅसिनोचा वाद विकोपाला

'IPL'चा रुबाबच वेगळा! खेळाडूंनंतर कॉमेंटेटर्सनीही 'PSL'ला दाखवला 'ठेंगा', धरली भारताची वाट

SCROLL FOR NEXT