Senior citizen  Dainik Gomantak
गोवा

म्हापशातील आजींचा मतदानासाठी उत्साह, ऊनाची पर्वा न करता बजावला हक्क

लोक कोणत्या राजकीय पक्षाला जनादेश देणार हे 10 मार्च रोजी स्पष्ट होणार असले तरी लोकांचा मतदानासाठीचा उत्साह आज गोव्यात बघायला मिळत आहे.

Akash Umesh Khandke

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गोमंतकीय आज कामकाज बाजूला ठेऊन घराबाहेर पडले आहेत. राज्यात सर्व मतदान केंद्रांवर मतदार रांगेत उभे बघायला मिळत आहेत. यामध्ये नव मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. लोक कोणत्या राजकीय पक्षाला (Political Party) जनादेश देणार हे 10 मार्च रोजी स्पष्ट होणार असले तरी लोकांचा मतदानासाठीचा उत्साह आज गोव्यात बघायला मिळत आहे. (Senior citizen in goa)

लोकशाहीवरील (Democracy) विश्वासाखातर म्हापसा येथील ज्येष्ठ नागरिक सुशिला बांदेकर रणरणत्या उन्हातदेखील मतदान करण्यास घराबाहेर पडल्या. मतदान केल्यानंतर गोमन्तकशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "मला नीट बोलताही येत नाही, चालताही येत नाही. पण माझा उमेदवार जिंकावा म्हणून मी मतदान केले आहे. मी ज्या उमेदवाराला मतदान केले त्याला जास्तीत जास्त मते मिळतील आणि तोच सत्तेवर येईल, असेही त्या म्हणाल्या.

सुशिला बांदेकर आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर मतदान करण्यास आल्या होत्या. त्यांना चालताना त्रास होत होता, मात्र तरीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस त्यांनी कोरोना (Coronavirus) निर्बंधांचे पालन करत मास्क घातला होता. डोळ्यावर भिंगांचा चष्मा आणि तोंडावर मास्क घालून मतदान केंद्रावर आलेल्या आज्जी या नवमतदारांना न चुकता मतदान करण्याचा संदेश देऊन गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT