मतदान करा आणि गोव्याच्या विजयात सामील व्हा; तानावडे यांचे गोमंतकीयांना आवाहन

तानावडे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारानंतर आता मतदान करण्याची वेळ आली आहे.
Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज मतदान केले. त्यांनी गोव्यातील जनतेला घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. तानावडे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारानंतर आता मतदान करण्याची वेळ आली आहे. लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करा आणि गोव्याच्या (Goa) विजयात सामील व्हा. (Goa Election 2022 Voting Begins Live Updates)

Sadanand Shet Tanavade
पंतप्रधान मोदींचा सकाळीच फोन, म्हणाले...:मुख्यमंत्री सावंत

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मये येथे मतदान केले. गोवा राज्यचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोठंबी येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्याआधी मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी श्री रुद्रेश्वर देवस्थानात प्रार्थना केली. त्यांचे वडील माजी झेडपी सदस्य पांडुरंग सावंत यांनी देखील मतदान केले आहे.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, भाजपचे काम जनतेसमोर आहे. मला खात्री आहे की आम्हाला बहुमत मिळेल. मायकल लोबो आणि उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा निवडणुकीत पराभव होईल. सावंत यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com