Mandrem Drowning Case Dainik Gomantak
गोवा

Mandrem Drowning Death: पोहोल्याने मैत्रीण वाचली मात्र रशियन नागरिकाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

Mandrem Beach Drowning Case: समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेल्या एक रशियन नागरिकाचा बुडून अपघाती मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: मांद्रे समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेल्या एक रशियन नागरिकाचा बुडून अपघाती मृत्यू झाला आहे. मांद्रे पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत तपास हाती घेतला.

पोलिसांनी सांगितले की त्यांना समुद्रात एक मृतदेह वाहून गेल्याची माहिती मिळाली आणि पुढील तपास केल्यानंतर हा मृतदेह दिमित्री चुवाकाएव नावाच्या ३४ वर्षीय रशियन नागरिकाचा असल्याची ओळख पटली.

मृत व्यक्ती एका मैत्रिणीसोबत मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेली असता, पोहोताना पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि ते दोघे वाहून गेले.

सोबत असलेल्या मैत्रिणीने खडकापर्यंत पोहून स्थानिकांच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवला मात्र

दिमित्री चुवाकाएव यांचा समुद्राच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मांद्रे पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT