CCTV Camera Dainik Gomantak
गोवा

CCTV Camera In Margaon: मडगावात पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव; देखभाल आणि देखरेखीची गरज अन्यथा...

Margaon News: मडगावात पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला असून ८ ऑक्टोबर रोजी मडगाव पालिका मंडळाची जी बैठक होणार आहे, त्यात हा प्रस्ताव चर्चेस येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: शहरात पुन्हा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला असून ८ ऑक्टोबर रोजी मडगाव पालिका मंडळाची जी बैठक होणार आहे, त्यात हा प्रस्ताव चर्चेस येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि त्यांचे उदघाटन समारंभ करणे, हे लोकांना अपेक्षित नाही.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांची देखभाल आणि देखरेख ठेवणारा विभाग आवश्यक आहे. अन्यथा त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे म्हणजे सरकारी निधीचा शुद्ध अपव्यय आहे, असे मत शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केले आहे.

कुतिन्हो म्हणाले की, २०१२ साली तत्कालीन जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यांनी काही आमदारांसह दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक सादर केले होते. तेव्हा संपूर्ण शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवण्याचे स्वप्न मडगावच्या नागरिकांनी पाहिले होते.

तेव्हा घोषणा करण्यात आली होती की, सुरुवातीला होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका चौकापर्यंतचा ३ किलोमीटरचा रस्ता पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला जाईल आणि मडगाव हे गोव्यातील सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पहिले शहर ठरले, याची आठवण कुतिन्हो यांनी करून दिली.

२०२० मध्ये आमच्या अधिकारिणींना स्वप्नील वाळके या सराफी व्यावसायिकाची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानंतर सीसीटीव्हीसंदर्भात जाग आली. त्यावेळी खासदार योजनेद्वारे १० कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले.

कॅमेरे पुन्हा सुरू करण्याच्या कार्यक्रमात मडगावच्या आमदारांनी जाहीर केले की, त्यांनी तत्कालीन दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याकडून अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. सार्दिन यांनीही त्यास सहमती दर्शविली आणि आवश्यक निधीचे वाटप करणार असल्याचे जाहीर केले.

२५ लाखांचा चुराडा

काही वर्षांनी खासदार योजनेतून सुमारे २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. दुर्दैवाने काही कालावधीतच ते देखभालीच्या अभावी चालत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृतपणे ते पालिकेकडे सुपूर्द केले नसल्याची वार्ता फिरू लागली.

याभरात सरकारी निधीचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. एका दशकापूर्वी ही खूप मोठी रक्कम होती, असे सांगत कुतिन्हो यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला.

शहरात ३८ ठिकाणी बसविणार कॅमेरे

यापूर्वी मडगाव पोलिसांनी जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत, अशा १०० ठिकाणांची यादी तयार केली होती. आज चार वर्षांनंतर १० पैकी किती सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत हे मडगावकरांसाठी आणखी एक रहस्य बनले आहे.

आमदार दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर फ्रान्सिस सार्दिन हे खासदार राहिलेले नाहीत. मडगाव पालिकेने पुन्हा एकदा शहरात ३८ वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कल्पना मांडली आहे, असे कुतिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

SCROLL FOR NEXT