Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा शिपयार्डात नोकरीच्या बहाण्याने तरुणांना गंडवले, पैसे परत मागणाऱ्यांच्या अंगावर सोडायची कुत्रा; 'चाची 420' विरुद्ध FIR

Fraud complaint Goa woman Shipyard jobs: युवकांकडून पैसे घेणाऱ्या एका महिलेविरोधात संबंधित युवकांपैकी काहीजणांनी पोलिसात तक्रार केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shipyard Job Scam Crime News

पणजी : गोवा शिपयार्डमध्ये कामाला लावते असे सांगून सडा, मांगोरहिल, नवेवाडे येथील काही युवकांकडून पैसे घेणाऱ्या एका महिलेविरोधात संबंधित युवकांपैकी काहीजणांनी पोलिसात तक्रार केली आहे. तथापि, आपण त्यांच्याकडून पैसेच घेतले नसल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या महिलेने यापूर्वी मुरगाव पालिका निवडणूक लढविली होती. तथापि तिला पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्वी तिने काही युवकांना गोवा शिपयार्डमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते.

बहुतांश युवकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले होते. ज्यांनी पैसे दिले होते, त्यापैकी काहीजण तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांना नोकरी मिळाली नसल्याने त्यांनी आपले पैसे या महिलेने परत द्यावे, अशी मागणी केली आहे. त्या महिलेने पैसे घेऊन चार वर्षे झाले, परंतु अद्याप नोकरीही नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याने त्या युवकांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

ही महिला आम्हाला वारंवार आश्वासन देते, आता तर पैसे मागण्यास घरी गेल्यास अंगावर कुत्र्यांना सोडते. घरी परत परत येऊ नका, अशी धमकावत असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. त्या महिलेने गोवा शिपयार्डचे बोगस लेटरहेड तयार केले आहे. त्याचा वापर करून तिने सरकारी इस्पितळात त्या युवकांना नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय दाखला मिळवून दिला होता, परंतु त्या युवकांना अद्याप कोणतीही नोकरी मिळाली नाही. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT