Konkani Parishad Goa Konkani Parishad Goa
गोवा

Konkani Parishad Goa: गोव्यात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाला कोकणी भाषा येणं अनिवार्य!!

Akhil Bhartiya Konkani Parishad Session: मडगाव येथील रवींद्र भवनात सुरु असलेल्या कोकणी परिषदेच्या ३१ व्या अधिवेशनाची रविवारी सांगता.

गोमन्तक डिजिटल टीम

Akhil Bhartiya Konkani Parishad, Madgao Goa

मडगाव: मडगाव येथील रवींद्र भवनात सुरु असलेल्या कोकणी परिषदेच्या ३१ व्या अधिवेशनाची रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) सांगता झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अवधूत तिंबलो, अध्यक्ष फादर मोईझिन आताईद, चेतन आचार्य, प्रशांत नाईक, शिरीष पै, मंगलदास भट, रत्नमाला दिवकर, अनंत अग्नी इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे उद्योजक अवधूत तिंबलो यांनी कोकणी भाषेत विविधता आहे असे म्हणत भाषेचा पुरस्कार केला, त्यांच्यामते गोव्यात नोकरीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला कोकणी भाषा येणं अनिवार्य आहे, कारण यामुळे राज्यात कोकणी भाषिकांची संख्या वाढेल.

उद्योजक अवधूत तिंबलो म्हणालेत की लहानपणीपासून भाषेचा प्रवास सुरु होतो, मात्र नंतर कामानिमित्त माणसाला अनेक भाषा शिकाव्या लागतात. "मी स्वतः देखील लहानपणी मराठी शिकलो मात्र पोर्तुगीजकाळ असल्याने पोर्तुगीज शिकवली लागली तरीही कोकणी माझी कायम मातृभाषा राहील".

माणसाने कितीही भाषा शिकल्या तरीही पाया मात्र कायम मातृभाषा हाच राहिला पाहिजे. गोव्यात सर्वांनी मिळून कोकणी बोलूया, कोकणी लिहूया. एकमेकांशी संवाद साधताना कोकणीशिवाय इतर भाषेचा वापर करू नका. मंगळुरू,कोचीन, महाराष्ट्र या भागांमध्ये कोकणी भाषिकांचे नाते तयार व्हावे म्हणून प्रयत्न करूयात असे मत तिंबलो यांनी व्यक्त केले.

गोव्याबाहेर जाऊन नोकरी करणारा माणूस तिथल्या भाषा शिकतो मात्र गोव्यात नोकरीसाठी येणार माणूस कोकणी शिकत नाही. गोव्यात येणारे आयएएस अधिकारी देखील कोकणी शिकत नाही. गोव्यात स्थलांतरित झालेल्या माणसांनी कोकणी शिकली पाहिजे, कारण येणाऱ्या काळात यामुळेच कोकणी बोलणाऱ्यांची संख्या वाढेल असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT