Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गुजरातमधील बेपत्ता अल्पवयीन मुलगी गोव्यात सापडली; मित्रांसोबत आली होती फिरायला

गुजरातमधून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी घरी पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Manish Jadhav

कधीतरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण कुणी यासाठी गोव्याला घरातून पळून येत नाही... होय, गुजरातमधून गोव्याला फिरण्यासाठी पळून आल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. एक अल्पवयीन मुलगी दोन अल्पवयीन मुलांसोबत गोव्याला पळून आली. हे तिघेही 16 जुलैपासून बेपत्ता होते. घरी आई वडिलांना न सांगता मुलगी या दोन मुलांसोबत गुजरातमधून गोव्याला आली. हे तिघेही गोव्याला फिरायला आले होते. ते इथे एक रुम करुन राहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी चांदखेडा, अहमदाबाद येथील रहिवासी आहे. मात्र अचानक 16 जुलै रोजी ती बेपत्ता झाली. मुलीच्या वडिलांना तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली. पोलिसात तक्रार नोंद केल्यावर पोलिसांनी त्वरीत तपास सुरु केला होता. मात्र तब्बल आठ दिवसांनी ती गोव्यातील पोबुंर्का येथे सापडली. पोबुंर्का येथे या मुलांचा मोबाईल नंबर पर्वरी पोलिसांनी ट्रेस केला.

दरम्यान, पर्वरी पोलिसांना त्वरीत गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर गुजरात पोलिसांचे पथक गोव्यात पोहोचले. त्यानंतर ते या मुलांना गुजरातला घेवून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT