ST Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: लोहिया मैदानावर आज होणार एल्गार, जमणार 5 हजार समाजबांधव

राजकीय आरक्षण : एसटी मेळाव्यात सरकारला विचारणार जाब !

गोमन्तक डिजिटल टीम

Goa ST Reservation: गोव्यात अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी संघटित प्रयत्न करणाऱ्या ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’ आणि अन्य संघटनांचा महामेळावा आज 25 मे ला मडगावच्या लोहिया मैदानावर भरणार असून या मेळाव्याला किमान 5 हजार एसटी बांधवांची उपस्थिती असेल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

आमचा न्याय्य अधिकार असलेले राजकीय आरक्षण अजून का मिळत नाही, असा थेट सवाल या महामेळाव्यात भाजप सरकारला विचारण्यात येणार आहे.

गुरुवारी बाळ्ळी आंदोलनातील हुतात्मे मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांची पुण्यतिथी असून त्याच दिवशी हा महामेळावा आयोजित केला आहे. 25 मे 2011 रोजी बाळ्ळी येथे असेच विराट जनमोर्चा घेऊन आंदोलन केले होते.

त्यानंतर उद्या पहिल्यांदाच असा विराट समुदाय एकत्र येणार आहे. आदिवासी लोकांचा आवाज बुलंद व्हावा, यासाठी आठ संघटना एकत्र येऊन ‘उटा’ ही संघटना स्थापन केली होती.

प्रत्येक संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उटा संघटनेच्या कार्यकारी मंडळावर होता. पण ही संघटना माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्या हाती गेली आणि ती मोडकळीस आली, असा आरोप गोविंद शिरोडकर यांनी केला.

मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता

गोव्यात आम्हाला एसटी दर्जा 2003 साली मिळाला. समाजावर होणारा अन्याय दूर व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी 2011 मध्ये 12 मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या आंदोलनात आमच्या दोन युवा कार्यकर्त्यांचे बळी गेले.

आता या घटनेलाच 12 वर्षे उलटली. मात्र, या 12 मागण्यांतील आमची एकही मागणी परिपूर्ण झालेली नाही, अशी खंत एसटी समाजाचे प्रवक्ते गोविंद शिरोडकर यांनी व्यक्त केली.

ठरणार पुढील आंदोलनाची दिशा

गोव्यातील एसटींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी जो प्रस्ताव तयार केला गेला, त्याची फाईल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात गेले तीन महिने धूळ खात पडली आहे. या सर्व गोष्टी उद्या आम्ही लोकांसमोर ठेवू.

या सर्व मुद्द्यांवर उद्याच्या मेळाव्यात विचारमंथन होणार आहे. त्यातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन’चे प्रवक्ते गोविंद शिरोडकर म्हणाले.

चळवळ भाजपकडे ठेवली गहाण

उटाच्या झेंड्याखाली आदिवासी बांधवांनी जी चळवळ उभी केली होती, ती आमच्याच नेत्यांनी मोडित काढली. त्याला माजी मंत्री प्रकाश वेळीप, सभापती रमेश तवडकर आणि मंत्री गोविंद गावडे हे जबाबदार आहेत, असा आरोप युवा एसटी नेते रवींद्र वेळीप यांनी केला.

स्वार्थासाठी या नेत्यांनी ही चळवळ भाजपकडे गहाण ठेवली., हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे, असेही रवींद्र वेळीप म्हणाले.

9 तालुक्यांत जनजागृती-

या महामेळाव्यासाठी आम्ही एसटी बहुल अशा 9 तालुक्यांत जागृती सभा घेतल्या असून या नऊही तालुक्यांतून लोक भरभरून मडगावात येतील, असा विश्र्वास यासाठी पुढाकार घेतलेल्या ‘गाकुवेध फेडरेशन’चे उपाध्यक्ष रवींद्र वेळीप यांनी व्यक्त केला.

सकाळी उपोषण आणि सायंकाळी विचारमंथन, असे या महामेळाव्याचे स्वरूप आहे.

संघाने केली चळवळ ‘हायजॅक’-

बाळ्ळी आंदोलनाच्या वेळी संघाने संपूर्ण चळवळच हायजॅक केली. प्रकाश वेळीप आणि रमेश तवडकर या संघप्रणित नेत्यांचा त्यात सहभाग होता. या आंदोलनाचा फायदा घेऊन भाजपला सत्तेवर यायचे होते.

आमच्या दोन युवकांचा बळी गेला; पण त्यांनी डाव साधला. इप्सित साध्य झाल्यावर त्यांनी एसटींना वाऱ्यावर सोडले. हा राग एसटी बांधवांच्या मनात धुमसत आहे. असे वेळीप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT