Goa Cricket Association Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: किंग्स स्कूलच्या जेतेपदात लेगस्पिनर जय कांगुरीचा वाटा

दक्षिण विभागीय क्रिकेट: दिलीप सरदेसाई करंडक शालेय स्पर्धेत विजेतेपद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cricket Association लेगस्पिनर जय कांगुरी याने हॅटट्रिकसह टिपलेले सात गडी, तसेच आराध्य गोयल याच्या शानदार 82 धावांच्या बळावर द किंग्स स्कूलने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या दिलीप सरदेसाई करंडक शालेय क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागीय विजेतेपद मिळविले.

अंतिम सामन्यात त्यांनी वास्कोच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटवर सहा विकेट राखून मात केली. स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर झाला.

सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटचा डाव 197 धावांत संपुष्टात आला. त्यांच्यातर्फे खिंड लढवताना द्विज पालयेकर याने सर्वाधिक 78 धावा केल्या. जय याने 35 धावांत 7 गडी टिपले.

द किंग्स स्कूलने 34 व्या षटकात विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना 4 बाद 198 धावा केल्या. आराध्य याने 95 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. याशिवाय शमीक कामत याने 43 चेंडूंत सात चौकारांसह 49 धावा नोंदविल्या.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव रुपेश नाईक, ज्युनियर क्रिकेट निवड समितीचे सदस्य महेंद्र नाईक, स्पर्धा समन्वयक अजित गावकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

संक्षिप्त धावफलक

सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट: 44.5 षटकांत सर्वबाद 197 (द्विज पालयेकर 78, सुजय परमेकर 30, प्रथमेश कदम 18, जय कांगुरी 7-35, व्यंकट चिगुरुपती 2-24, रुद्राक्ष मनचंदा 1-50) पराभूत

विरुद्ध द किंग्स स्कूल: 33.3 षटकांत 4 बाद 198 (आराध्य गोयल 82, शमीक कामत 49, जय कांगुरी 15, सार्थक शेटगावकर 2-34, सार्थक तोरसकर 1-37, शिवराज लकुंडी 1-18).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT