Goa-Mumbai Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Goa-Mumbai Bus Accident: वारणा नदी पात्रात गोवा - मुंबई प्रवासी बस कोसळली

गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.

Pramod Yadav

Goa-Mumbai Bus Accident: गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा कोकरूड, शाहूवाडी येथे अपघात झाला. बस थेट पुलावरून वारणा नदी पात्रात कोसळसली. गुरुवारी (दि.09) सकाळी 6 वाजता हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा- मुंबई खासगी प्रवासी बस कोकरूड (शाहूवाडी) येथील पुलावरून वारणा नदी पात्रात कोसळली. सुदैवाने या अपघात कोणीही दगावले नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पुलावरुन बस खाली कोसळल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून, बसला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पाऊलो या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीची ही बस असल्याचे समोर आलेल्या व्हिडिओतून दिसत आहे.

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे प्रवास करत आहेत. त्यामुळे सरकारी तसेच, खासगी बस वाहतूक जोमात सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT