A garden in Amone blooming with marigold flowers. Tukaram Sawant Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत दसऱ्याला मिळणार स्थानिक झेंडू ; मळे बहरले

कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनीही तसा विश्वास व्यक्त केला आहे. यंदा डिचोलीत झेंडू फुलांचा बहर वेळेवर आणि समाधानकारक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, संतुलीत हवामानामुळे यंदा डिचोलीत झेंडू फुलांचे मळे वेळेवर बहरले असून, यंदा दसरा सणात स्थानिक झेंडूची फुलांचा तुटवडा निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनीही तसा विश्वास व्यक्त केला आहे. यंदा डिचोलीत झेंडू फुलांचा बहर वेळेवर आणि समाधानकारक आहे.

असे विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी दीपक गडेकर यांनी सांगितले आहे. असंतुलित पावसामुळे गेल्या वर्षी झेंडू फुलांचा बहर लांबणीवर पडला होता. त्यामुळे ऐन दसऱ्यात स्थानिक झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण झाला होता.

परिणामी गेल्यावर्षी ऐन दसरा सणात डिचोलीतील जनतेला कर्नाटक राज्यातून येणाऱ्या झेंडू फुलांवर अवलंबून रहावे लागले होते.

कृषी खात्याच्या सहकार्याने यंदा साळ, अडवलपाल, आमोणे आदी भागात मिळून डिचोलीत यंदा साडेतीन हेक्टर जमीन झेंडू लागवडीखाली आली आहे.

३० हून अधिक शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे. यंदाही स्थानिक नर्सरीत उगवलेली झेंडूची रोपटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

कर्नाटकातील फुले डिचोलीत

दसऱ्याला झेंडू फुलांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे दरवर्षी कर्नाटक राज्यातून डिचोलीत प्रचंड प्रमाणात झेंडू फुलांची आवक होत असते.

दसरा जवळ आल्याने कर्नाटकातून डिचोलीत झेंडू फुलांची आवक सुरु झाली आहे. शनिवारी तर डिचोलीत मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील झेंडू फुलांची आवक झाली होती.

शनिवारी सायंकाळपर्यंत ७० रुपये प्रति किलो, अशा प्रकारे झेंडू फुलांचे दर होते. मात्र सोमवारपर्यंत उपलब्ध होणाऱ्या झेंडू फुलांच्या उपलब्धतेवर झेंडू फुलांचे दर निश्चित होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT