Fish Container Two Wheeler Accident at Balli Goa: Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: बाळ्ळीत मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेला नेले फरफटत

ड्रायव्हरला चोप, दुचाकीस्वार तरूणासह महिला जखमी

Akshay Nirmale

Fish Container Two Wheeler Accident at Balli Goa: बाळ्ळी येथे मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनर दुचाकीस जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तरूण आणि महिला जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनरचालकास स्थानिकांनी पकडून चोप दिला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वरबाळ्ळी ते काणकोण मार्गावर हा अपघात झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास मासळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तरूण आणि महिला यांना दुखापत झाली आहे. सुदैवाने दोघेही बचावले. तथापि, त्यांच्या अंगावर मोठ्या जखमा झाल्या आहेत.

सर्वेश असे या जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीवर (GA B 1064) पाठीमागच्या सीटवर त्याची मावशी बसली होती. दोघांनाही दुखापत झाली असून धडकेमुळे गाडीवरून पडल्याने उभा राहण्याची क्षमता दोघांमध्ये नव्हती.

कंटेरनने संबंधित महिलेला सुमारे 50 मीटर फरफटत नेले. हा कंटेनर (KA 20 D 7036) कनार्टकचा आहे.

स्थानिकांसह वाहनचालकांनी संबंधित ट्रकचालकाला पकडून ठेवत त्याला चोपही दिला. स्थानिकांनीच जखमींना धीर देत रूग्णवाहिकेला फोन केला. रूग्णवाहिकेतून दोघाही जखमींना बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गंभीर वाटल्यास त्यांना मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या अपघातामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT