Benaulim Beach Dainik Gomantak
गोवा

Benaulim: दारुच्या नशेत झिंगल्या बहिणी; एक खोल समुद्रात बुडाली अन् पुढे घडले असे काही...

बाणावली किनाऱ्यावर घडला प्रकार

दैनिक गोमंतक

बाणावली किनाऱ्यावर आज सकाळच्यादरम्यान पर्यटक महिला समुद्रात बुडाल्याचा प्रकार घडला आहे. पर्यटनासाठी आलेले कुटुंब बाणावली किनाऱ्यावर आले असता दारुच्या नशेत महिला समुद्रात शिरली व बुडू लागली. या घटनेचे गांभीर्य ओळखत जीवरक्षकांनी महिलेला तातडीने पाण्यातून बाहेर काढले आहे.

(A drowning woman has been rescued on BENAULIM beach)

मिळालेल्या माहितीनुसार आज बाणावली किनाऱ्यावर एक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. यापैकी दारूच्या नशेत असलेल्या पर्यटक महिलेने समुद्रात खोल जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे समुद्रात बुडाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे गांभिर्य ओळखत समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक अनन्या बाथ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पर्यटक महिलेला तातडीने पाण्याबाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुडालेली महिला कुटुंबासोबत पर्यटनासाठी आली होती. यावेळी तीने दारुच्या नशेत खोल समुद्रात शिरली अन् मोठ्या लांटांमुळे तिच्या नाका, तोंडात पाणी शिरले, आणि ती गुदमरु लागली यावेळी सोबत असलेली तीची बहिण आणि कुटुंबियांनी जोराने ओरडायला सुरुवात केली. यावेळी जीवरक्षक अनन्या बाथ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तीला पाण्याबाहेर काढले आहे.

जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्यात बुडालेल्या महिलेला बाहेर काढण्यात आल्यानंतर तीला श्वास घेण्यास समस्या जाणवत होती. त्यामुळे तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तीची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे पीडितेला पुढील तपासणीसाठी आपत्कालीन सेवांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT