CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: स्वच्छ, हरित गोव्याची जबाबदारी प्रत्‍येक गोमंतकीयाची

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant कचऱ्याचे सर्वत्र दिसणारे साम्राज्य पाहता स्वच्छता ही आज प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. स्वच्छ व हरित गोवा साकारणे हे केवळ सरकारचेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

नगरसेविका सिद्धी प्रभू यांच्या पुढाकाराने हाऊसिंग-बोर्ड साखळी येथे ॲक्‍सिस बँक, सरकारी उच्च माध्यमिक, गोवा जैवविविधता मंडळ व डेस्टिनी म्युझिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता अभियानात मुख्‍यमंत्री बोलत होते. सुमारे दीडशे विद्यार्थी व नागरिकांनी त्‍यात सहभाग घेतला.

यावेळी साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेविका सिद्धी प्रभू, दयानंद बोर्येकर, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, ॲक्‍सिस बँकेच्या उत्तर गोवा प्रमुख कार्मेन व्हिएगस, साखळी सरकारी उच्च माध्यमिक हायस्कूलच्या प्राचार्य आशा नाईक, समीर प्रभू व इतरांची उपस्थिती होती.

‘या’ गोष्‍टी पाळा

सिंगल यूज’ प्लास्टिकवर स्वतःहून बंदी अंमलात आणावी. राज्याच्या सौंदर्याला आज सर्वत्र विखुरलेल्‍या प्लास्टिकमुळे बाधा पोहोचत आहे. सरकारने ‘सिंगल यूज’ प्लास्टिकवर बंदी घातली असतानाही त्याचा सर्रास वापर होत आहे.

पाणी पिऊन प्लास्टिक बाटली रस्त्यावर किंवा खुल्या जागेत फेकण्यापेक्षा घरातून निघताना बाटलीत पाणी घेऊन निघाल्यास अशा प्रकारच्या प्रदूषणावर आपण नियंत्रण आणू शकतो.

अशा लहानसहान गोष्टी लक्षात घेऊन जबाबदारीने वागल्यास प्रदूषण व कचरा समस्‍या आटोक्यात येईल, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT