Private Hotel Registration  Dainik Gomantak
गोवा

Goa News: हॉटेलात राहिले आणि अर्धे बिल देऊन पळाले; चौघांवर गुन्हा

Goa News: चौघांवर गुन्हा; कळंगुटमधील आस्थापनाला लावला 9 लाखांचा चुना

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात गेले काही दिवस दलालांकडून पर्यटकांची फसवणूक केल्याच्या वृत्तांनी वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जात होते. त्यामुळे पर्यटकांमध्येही घबराट निर्माण झाली होती. मात्र, मोठ्या संख्येने जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या देशी पर्यटकांनीच एका हॉटेल व्यवस्थापनाला 9 लाखांचा चुना लावल्याचा गंभीर प्रकार कळंगुटमध्ये घडला आहे.

याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी खोल्या बुक करणाऱ्या चौघांच्या विरोधात भादंसंच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

या चौघाही संशयितांनी ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत १२० जणांसाठी हॉटेलच्या ४५ खोल्या बूक केल्या होत्या. ठरल्याप्रमाणे १२० जण हॉटेलमध्ये येऊन पाच दिवस राहिले. यावेळी पुरेपूर मौजमजा करून ते माघारी परतले. या कालावधीत त्यांना हॉटेलने पुरविलेल्या सेवेचे एकूण १६ लाख ९ हजार ४४५ रुपये बिल झाले.

यातील केवळ ६ लाख ८८ हजार रुपये बिल त्यांनी भरले. मात्र, उर्वरित ९ लाख २१ हजार ४४५ रुपये दिलेच नाहीत. त्यामुळे या पर्यटकांनी हॉटेलची फसवणूक केली असल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिस संशयितांच्या मागावर : उतरुण अगरवाल (उत्तर प्रदेश), ए. के. गुप्ता, मनीष कासना (रायपूर) आणि रवितेज ऊर्फ प्रशांत कुमार (कर्नाटक) यांच्या विरोधात नीलम हॉटेलचे व्यवस्थापक जेकब जॉन यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या संशयितांंच्या मागावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT