Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: युवतीच्या विनयभंगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Crime News: थिवी येथे एका 18 वर्षीय युवतीचा आंघोळ करतेवेळी व्हिडिओ काढण्याचा प्रकार उघडकीस आला.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News:

थिवी येथे एका 18 वर्षीय युवतीचा आंघोळ करतेवेळी व्हिडिओ काढण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही घटना रविवार, १० मार्च रोजी सायंकाळी घडली.

पीडित युवती घरातील स्वच्छतागृहात आंघोळ करीत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने खिडकीतून तिचा मोबाईलवर व्हिडिओ काढला. याची चाहूल लागताच तिने आरडाओरडा केला. तेव्हा संशयिताने घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र, पळताना त्याचा मोबाईल घटनास्थळीच पडला. हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

युवतीचा आरडाओरडा ऐकून तिचे पालक आणि शेजारील लोक धावून आले. यावेळी संशयित लोकांच्या तावडीत सापडण्यापूर्वीच पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आजूबाजूच्या परिसरात संशयिताचा शोध घेतला; पण तो सापडू शकला नाही. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंसंच्या ३५४ क कलमांन्वये अज्ञात संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर हे करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT