Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Dengue Death: बालिका मृत्युप्रकरणाची सुई मुख्यमंत्र्यांकडे!

Dengue Death: आरोग्य खात्याने टोलवला चेंडू: पदनिर्मितीच्या दप्तर दिरंगाईकडे दाखविले बोट

दैनिक गोमन्तक

Dengue Death: डेंग्यूची लागण झालेल्या 6 वर्षीय बालिकेचा चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पुरेसे डॉक्टर नसल्याने मृत्यू झाल्यानंतर सरकारी इस्पितळांतील अपुऱ्या कर्मचारी वर्गाचा प्रश्न चर्चेत आला आहे.

चिखलीतील इस्पितळात पदनिर्मिती करण्यास सरकारने दप्तर दिरंगाई केल्याने कार्मिक खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे या प्रकरणातील जबाबदारीचा चेंडू टोलवला गेला आहे.

आरोग्य खात्याने नियमित पदनिर्मिती करता येत नसेल, तर निदान कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीस मागितलेली परवानगीही कार्मिक खात्याने न दिल्याने ही स्थिती उद्‍भवल्याची माहिती मिळाली आहे.

आरोग्य खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य सेवा संचालनालयात 234 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी प्रस्ताव सचिवालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला

मान्यता मिळालेली नाही. चिखली येथील इस्पितळात बालरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी दोन महिन्यांपूर्वीच मागणी करण्यात आली होती. त्याला सरकारने मान्यता न दिल्याने नंतर निदान कंत्राटी पद्धतीने नियुक्तीची मागणी करण्यात आली होती.

त्यावरही निर्णय न झाल्याने चिखली इस्पितळात गुंतागुंतीची आरोग्य प्रकरणे हाताळण्यासाठी वेळेवर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकलेला नव्हता. या प्रकरणी आरोग्य खात्याकडून सरकारी पातळीवर पाठपुरावा करूनही 15 दिवसांत फाईल हल्ली गेली नव्हती.

यामुळे चिखलीतील प्रकरणात आरोग्य खात्याचा दोष नाही, दोष असेल तर तो सरकारी पातळीवर झालेल्या दप्तर दिरंगाईचा आहे असे आरोग्य खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. स्थानिक आमदार या नात्याने पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी उद्विग्नपणे आरोग्यमंत्र्यांकडे दाद मागण्याऐवजी ती मुख्यमंत्र्यांकडेच मागावी असेही या सूत्रांनी सांगितले.

डॉक्टरसाठी माविननी जोडले हात!

या इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी मी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना आजवर अनेकवेळा विनंती केली. कुटीर इस्पितळ असताना जेवढे कर्मचारी होते तेवढेच कर्मचारी आता उपजिल्हा इस्पितळ झाल्यावरही आहेत. सीएसआरखाली मी कित्येक उपकरणे इस्पितळासाठी मिळवून दिली आहेत.

दीड वर्षे सहा कर्मचाऱ्यांचे वेतन मी माझ्या खिशातून दिले, तेव्हा ते इस्पितळ सुरू राहिले आहे. राणे यांनी माझ्यासोबत येऊन अनुभव घ्यावा अशी मी त्यांना विनंती केली होती. अजूनही त्याला प्रतिसाद नाही. आता ही मागणी मी हात जोडून जाहीरपणे करत आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

बालिकेचे मृत्यूचे मलाही दुःख झाले आहे. बालिकेचा मृत्यू का झाला याची मी चौकशी करणार आहे. डॉक्टरांचा दोष आहे की अन्य काही हे शोधावे लागेल. मी तेथे जाईन. डॉक्टर उशिराने पोचले असा आरोप आहे.
- माविन गुदिन्हो, पंचायतमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT