Manohar International Airport Mopa Goa Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: ‘मोपा’वर उभे राहणार 300 खोल्‍यांचे हॉटेल

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने भाडेपट्टीवर दिलेली जमीन 60 वर्षांसाठी पोटभाड्याने देण्यास सरकारने मान्यता दिल्यानंतर तेथे जिंजरचे 300 खोल्यांचे भव्‍य हॉटेल होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने भाडेपट्टीवर दिलेली जमीन 60 वर्षांसाठी पोटभाड्याने देण्यास सरकारने मान्यता दिल्यानंतर तेथे जिंजरचे 300 खोल्यांचे भव्‍य हॉटेल होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

विमानतळालगत पश्‍चिम दिशेला असलेल्या मोकळ्‍या जागेवर हे हॉटेल उभारण्यासाठी आज करार करण्यात आला. ‘इंडियन हॉटेल्स’ ही देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी हे हॉटेल उभारणार आहे.

मोपा विमानतळ परिसरात ‘जिंजर’ या ब्रॅण्डखाली हे हॉटेल उभे राहील. कंपनीची दुसरी कंपनी असलेल्या रूटस् कॉर्पोरेशन या कंपनीशी जीएमआर कंपनीने 2 एकर जागा 60 वर्षांसाठी भाडेपट्टीने देण्यास करार केला आहे.

‘दाबोळी’ला ‘मोपा’च्या तुलनेत अधिक झळाळी

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ 2023 सालासाठी नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळाच्या​ पुढे आहे. दाबोळी विमानतळावर गेल्या वर्षी अधिक संख्येने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली होती. ज्यात प्रवाशांची संख्या जास्त होती,अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हळदोणाचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना गोव्यातील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील उड्डाणे आणि प्रवाशांची संख्या याबाबत अतारांकित प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या उत्तरानुसार, गेल्या वर्षी पेडणे येथे नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळाच्या तुलनेत दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जास्त उड्डाणे झाली आणि प्रवासी आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT