Youth Drowned At Cansaulim Quarry Dainik Gomantak
गोवा

Cansaulim News: कासावली येथील खाणीत 16 वर्षीय मुलगा बुडाला

पोहायला येत नसतानाही पाण्यात उतरण्याचे धाडस नडले

Akshay Nirmale

Youth Drowned At Cansaulim Quarry: कासावली येथील जांभा खडकाच्या खाणीत बुडून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अनिल चव्हाण (वय 16) असे या मुलाचे नाव आहे. तो वास्कोतील शांतीनगर येथील रहिवासी आहे.

दोन मित्रांसमवेत तो या खाणीवर अंघोळीसाठी गेला होता. या तिघांपैकी कुणालाही पोहायला येत नव्हते. ही खाण खोल आहे. अनिलला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. इतर दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांनाही त्याला वाचवता आले नाही.

सध्या घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. त्याच्या मृतदेहाचा शोध घेतला गेला. स्थानिक आनंद लमाणी यांनी या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. पोहायला न येणाऱ्या कुणीही येथे अंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहनही लमाणी यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT