Saint Francis Xavier Exposition Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

Saint Francis Xavier Exposition Preparation: २७ डिसेंबर रोजी ओल्ड गोव्यात खास लाईट आणि संगीत शोचे आयोजन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Pramod Yadav

Saint Francis Xavier Exposition Goa 2024 Preparation

जुने गोवे: गोव्यात एकाचवेळी दोन आंतरराष्ट्रीय सोहळे पार पडत आहेत. येत्या २० नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि २१ तारखेपासून संत फ्रान्सिस झेवियर यांचा पार्थिव प्रदर्शन सोहळा पार पाडणार आहे.

झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शन सोहळ्याचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सोहळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही तैनात करण्यात आले असून, संशयित व्यक्तीची तात्काळ चौकशी केली जाईल, असेही सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २१ तारखेपासून सुरु होणाऱ्या संत फ्रान्सिस झेवियर पार्थिव प्रदर्शन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो आणि मंत्री आलेक्स सिक्वेरा, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गिते, आयजीपी ओमवीर सिंग, चर्चचे फादर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

गोव्यात इफ्फी आणि पार्थिव प्रदर्शन हे दोन आंतरराष्ट्रीय सोहळे एकाचवेळी पार पडत आहेत. पार्थिव प्रदर्शन सोहळ्याची किरकोळ वगळता ९८ टक्के तयारी पूर्ण झाली आहे. बॅसीलिका बॉम जिझस चर्च परिसरात हा सोहळा होणार असून, तयारीचा भाग म्हणून याची दहा विभागात विभागणी करण्यात आली आहे.

यामध्ये राहण्याची व्यवस्था, यात्री निवास, स्वच्छतागृह, पार्थिव दर्शन कक्ष, से कॅथेड्रल या विभागांचा समावेश आहे. सोहळ्यात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, या परिसरात ६०० वाहतूक आणि ७०० पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

सोहळ्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून, संशयित व्यक्तीची तात्काळ तपासणी केली जाईल, असे सावंत म्हणाले.

संत फ्रान्सिस झेवियर सोहळ्यात यात्री निवास आकर्षणाचा विषय ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. पणजी, फोंडा, म्हापसा, मडगाव अशा प्रमुख बस स्थानकांवरुन ओल्ड गोव्याला थेड बस सेवा पुरवली जाणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.

२७ डिसेंबरला खास लाईट आणि संगीत शो

२७ डिसेंबर रोजी ओल्ड गोव्यात खास लाईट आणि संगीत शोचे आयोजन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. से कॅथेड्रल येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Today's Live Updates Goa: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दीपराज गावकर करणार गोव्याचं नेतृत्व!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT