Goa Farmers Traditional Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farmers Traditional Farming: गोव्यात 17.186 हेक्‍टरवर प्राकृतिक, परंपरागत शेती! राज्‍यातील 9.668 शेतकऱ्यांना मिळाले तब्बल 12.83 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य

17186 Hectares Natural Farming Goa: ज्‍यातील १,६२३ शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीवर भर देत सुमारे ६३० हेक्‍टरमध्‍ये विविध पिकांची लागवड केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील ९,६६८ शेतकरी सुमारे १७,१८६ हेक्‍टरवर प्राकृतिक तसेच परंपरागत शेती कसत असल्‍याचे केंद्रीय कृषी राज्‍यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

गोव्‍यासह देशभरातील जे शेतकरी राष्‍ट्रीय प्राकृतिक मिशनअंतर्गत शेती करतात, त्‍यांच्‍यासाठी केंद्र सरकारने सुमारे ४४ लाखांचे, तर परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेती करणाऱ्यांसाठी १२.३९ कोटींचे अर्थसाहाय्‍य २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांसाठी निश्‍चित केले होते.

त्‍याचा लाभ घेत राज्‍यातील १,६२३ शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीवर भर देत सुमारे ६३० हेक्‍टरमध्‍ये विविध पिकांची लागवड केली. तर ८,०४५ शेतकऱ्यांनी या दोन वर्षांच्‍या काळात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत १२.३९ कोटींचे अर्थसाहाय्‍य घेत सुमारे ६,५५५ हेक्‍टर जमिनीत पिकांची लागवड केल्‍याचे मंत्री ठाकूर यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

प्राकृतिक, परंपरागत शेती म्‍हणजे काय?

  प्राकृतिक, परंपरागत शेती म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांविना केली जाणारी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती.

  यात शेणखत, गोमूत्र आणि निसर्गातील घटकांचा वापर करून जमिनीचा पोत व मानवी आरोग्य सुधारले जाते.

शेतीमध्ये गांडूळ खत, शेणखत आणि पालापाचोळा यांसारख्या स्थानिक घटकांचा वापर केला जातो.अशा घटकांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्‍यामुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. शिवाय त्‍यातून विषमुक्त व पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध होते.अशा प्रकारच्‍या शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT