Voting  Dainik Gomantak
गोवा

Goa panchayat Election 2022: कळंगुट प्रभागात 79.47 टक्के मतदान

निवडणूक अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली माहिती

दैनिक गोमन्तक

बुधवार दि. 10 ऑगस्ट रोजी राज्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत स्थगित ठेवण्यात आलेल्या कळंगुटच्या प्रभाग 9 चे मतदान आज पार पडले. ही मतदान प्रक्रिया मतदारांच्या उत्साही वातावरणात पार पडली. (79.47 percent voting took place in Calangute, Goa division)

प्रभाग 9 चे मतदान 79.47 टक्के झाले असून, 10 ऑगस्ट रोजी राज्यात पार पडलेल्या मतदानाचा टक्का 78.70 टक्के इतका आहे. तसेच आजच्या मतदानाचा टक्का ही 79.47 इतका आहे. राज्यात आज नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन साजरा होत असतानाही सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी हजेरी लावत आपले कर्तव्य बजावले.

कळंगुट पंचायत प्रभाग 9 मध्ये एकूण 952 मतदारांपैकी 752 मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीत संपुर्ण मतदान शांततेत पार पडले आहे. याची माहिती निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.

Narali Purnima: मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी वाहिला दर्याला नारळ

श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. रक्षाबंधनालाच नारळी पौर्णिमा साजरा करतात. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या निमित्त आज शापोरा येथे जेटीवर मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी समूद्राला नारळ वाहिला.

या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेची पुजा करत समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक समजले जाते. हे सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT