गोव्यातील 90 महिला सुरक्षारक्षक लोकांच्‍या सेवेसीठी सज्ज Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 90 महिला सुरक्षारक्षक लोकांच्‍या सेवेसीठी सज्ज

गोव्यातील महिला सुरक्षारक्षकांनी केलेली पासिंग परेड डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

दैनिक गोमन्तक

वाळपई: एकीकडे पाऊस व त्यामुळे मैदानावर तयार झालेला चिखल, अशा परिस्‍थितीत महिला सुरक्षारक्षकांनी (Women security guards) केलेली पासिंग परेड डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. वाळपईच्या वनप्रशिक्षण मैदानावर हा दीक्षांत सोहळा पार पडला. त्यात सुमारे 90 महिला सुरक्षारक्षकांनी आपले कलाकौशल्य पणाला लावताना सोहळ्यात रंगत आणली. (90 women security guards in Goa ready to serve people)

गोवा (Goa) मानव संसाधन मंडळातर्फे चौथ्या सुरक्षारक्षक तुकडीसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण वाळपई वनप्रशिक्षण केंद्रात घेण्यात आले. पहिल्या तीन तुकड्या पुरुषांच्‍या तर चौथी तुकडी महिलांची होती. ती लोकसेवेत दाखल झाली. मंडळाचे कार्यकारी संचालक नारायण नावती, वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीला महिला सुरक्षारक्षकांनी मान्यवरांना सॅल्‍युट करुन सन्मान दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे नावती यांनी तुकडीची पाहणी केली. ते म्हणाले की, कोविडच्या काळात जास्त रोजगार देणारे आमचे महामंडळ अव्‍वल ठरले आहे. आतापर्यंत दीड हजार बेरोजगारांना रोजगार दिला आहे. सध्‍या पाऊस असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नवीन तुकड्या केल्या जातील. गोमेकॉत सुरक्षारक्षकांचे काम कौतुकास्पद असून लोकांच्या मौल्यवान वस्तूही त्‍यांनी सुपूर्द केल्या आहेत. कमी पगारात देखील निस्वार्थी भावनेने हे लोक काम करत आहेत. डॉ. श्याम काणकोणकर यांनी महिला सुरक्षारक्षकांना शुभेच्छ्या दिल्या. यावेळी मानव संसाधन मंडळाचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT