Music Festival Dainik Gomantak
गोवा

Music Festival: धारगळ येथे 8वे संवादी संगीत संमेलन 17 डिसेंबरपासून

Dhargal: विवेक जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन: संमेलनाध्यक्ष अशोक परब, मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक

Music Festival: धारगळ येथे संवादी संगीत संस्थेचे 8वे संगीत संमेलन कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने 17 व 18 डिसेंबर रोजी श्री धारेश्वर देवस्थान प्रांगण, गाववाडा धारगऴ येथे आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक देवस्थळी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

या कार्यक्रमास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. संमेलनाचे उद्‍घाटक म्हणून कीर्तनकार विवेक जोशी हे असतील. कला संस्कृती संचालक अशोक परब हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील.

पेडणे येथे भगवती हायस्कूल येथे आयोजित पत्रकार परीषदेत हेमंत तुयेकर, अनय प्रभुदेसाई, रुपेश पंडित, महेश चुरी हे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थळी पुढे म्हणाले की,17 रोजी सायंकाळी 5वा. स्वप्नील मोरे यांचा ‘नाट्य संध्या’ हा नाट्यगीत कार्यक्रम होईल. त्यानंतर सव्वा सहा वाजता संमेलनाचे उद्‍घाटन होईल.

खास निमंत्रक म्हणून धारगळचे जि. पं. सदस्य मनोहर धारगळकर, सरपंच अनिकेत साळगावकर ,पंचसदस्य प्रदीप नाईक,धारेश्वर माउली देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई उपस्थित असतील. राया कोरगावकर, विश्वास मेस्त्री व प्रभाकर शेटगावकर यांचा सत्कार करण्यात येईल. 7:30वा.केतकी चैतन्य (मुंबई) यांचे गायन होईल.

दुसऱ्या सत्रात 5वा. राया कोरगावकर यांचे संवादी वादन होईल.6वा. प्रचला आमोणकर यांचे गायन, 7:30 वा. ओम बोंगाणे यांच्या गायनाने संमेलन सांगता होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT