Vegetable  Dainik Gomantak
गोवा

Vegetable Cultivation In Goa: राज्यात 8689 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड, उत्‍पादनात सासष्टी आघाडीवर; कृषी संचालनालयाचा रिपोर्ट

Agricultural Output in Salcete: राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला हा परराज्यातून म्हणजेच गोव्याशेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातून आयात केला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete News: राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला हा परराज्यातून म्हणजेच गोव्याशेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागातून आयात केला जातो. परंतु राज्यात रब्बी आणि खरीप हंगाम मिळून भाजीपाला लागवडीखाली सर्वाधिक म्हणजे २६४५ हेक्टर क्षेत्रफळ हे सासष्टी तालुक्यातील आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादनही सासष्टीतच घेतले जाते.

राज्यात कांदा, टॉमेटो आणि बटाटा याचे पीक घेतले जात नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते, परंतु इतर विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांचे उत्पादन राज्यात ग्रामीण भागातील शेतकरी घेतात. गोव्यात गेल्यावर्षी म्हणजे वर्ष २०२३-२४ आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी हंगाम मिळून एकूण ८६८९ हेक्टर क्षेत्रफळात भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात आले.

राज्यात एकूण ११४५३५ टन इतक्या भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात आले. राज्यात खरीप हंगामात ३१०४ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली होते, त्यातून ३२९६१ टन उत्पादन घेण्यात आले तर रब्बी हंगामात ५५८५ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली होते, त्यातून ८१५७४ टन उत्पादन घेण्यात आल्याचे कृषी संचालनालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात रब्बी आणि खरीप हंगाम मिळून भाजीपाला लागवडीखाली सर्वाधिक म्हणजे २६४५ हेक्टर क्षेत्रफळ हे सासष्टी (Salcete) तालुक्यातील आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादनही सासष्टीतच घेतले जाते. सासष्टीत एकूण ३१३१८ टन इतके भाजीचे उत्पादन घेण्यात आले.

परंतु सर्वात कमी १६२ हेक्टर भाजीपाला लागड क्षेत्रफळ धारबांदोडा तालुक्यात आहे. परंतु सर्वात कमी उत्पादन मात्र सांगे तालुक्यात नोंदवण्यात आले आहे. सांगे तालुक्यात १९६० टन इतक्या सर्वात कमी भाजीपाला उत्पादनाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT