Goa Online Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Online Fraud: ऑनलाईन फ्रेंडशिप पडली महागात! गोव्यातील मुलीला 8.5 लाखांना गंडा

Goa Online Fraud: ऑनलाईन फ्रेंडशिप : मग लग्नाचे आमिष

दैनिक गोमन्तक

Goa Online Fraud: एका तरुण युवतीला आपल्या ऑनलाइन मैत्री करून आणि लग्न करून प्रेमाचा संसार थाटण्याचे स्वप्न दाखवून एका युवकाने चक्क साडेआठ लाखांना गंडविल्याचा प्रकार नुकताच गोव्याच्या सायबर क्राईम पोलिसांच्या नजरेस आला आहे. पोलिसांनी याविषयी फसवणुकीचा गुन्हा त्या युवकावर दाखल केला आहे.

संपूर्ण जगात आज ऑनलाईनची क्रेझ आहे. लोकांची ओळख, मैत्री ऑनलाइन होतेच, पण हल्ली लोकांची ऑनलाइन लग्नेही जुळू लागली आहेत. ही बाब लक्षात घेता अनेक मॅट्रिमोनी साईट्स ऑनलाइन आढळू लागल्या आहेत, पण अशा मॅट्रिमोनी साइट्सद्वारे फसवणूकही होते हे या प्रकरणातून उघड झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील एका मुलीला अलीकडेच एका बनावट ऑनलाइन मॅट्रिमोनियल पोर्टलवरून कॉल आला.

त्या कॉलवर तिचे सर्व तपशील घेण्यात आले. त्यानंतर तिला काही दिवसांत वेगवेगळ्या मुलांच्या प्रोफाइल्स दिसू लागल्या.

त्यात त्या मुलीला एक स्थळ पसंत पडले आणि तिने त्या मुलाशी संपर्क साधला. त्यातून त्या दोघांची मैत्री झाली आणि पुढे काही दिवसांनी दोघेजण प्रेमात पडले. त्यानंतर त्या युवकाने लग्नाची बोलणी करायला गोव्यात येतो असे मुलीला सांगितले.

गोव्यात येण्याची विमानाची तिकिटेही तिला व्हॉट्सॲवर पाठवली. येताना संबंधित मुलीसाठी सोन्याचे दागिने आणि इतर महागडे साहित्य घेऊन येतो, असेही त्याने सांगितले.

काही दिवसांनी त्या मुलाने आपण गोव्यात पोहोचलो असून कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर आपल्याला अडवले असून आपल्याकडील साहित्य जप्त केल्याचे फोनवरून कळवले आणि साहित्य मिळवायला कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगून ऑनलाइन 8.5 लाख रुपये घेतले. काही दिवसांनी हा प्रकार त्या मुलीने तिच्या घरच्यांना सांगितला आणि थेट त्यांनी  सायबर क्राईममध्ये याबाबत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक विद्यानंद पवार पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT