Voting  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: केपे तालुक्‍यात 82.79 टक्के मतदान झाले!

एकूण 81 मतदानकेंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दैनिक गोमन्तक

केपे: केपे तालुक्यातील अकरा पंचायतींसाठी आज सुरळीत मतदान पार पडले. एकूण मतदान 82.79 टक्के झाले. एकूण 81 मतदानकेंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक पक्षीय पातळीवर झाली नसली तरी केपेचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्‍टा व माजी आमदार बाबू कवळेकर यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली आहे.

(82.79 percent polling took place in quepem taluka)

बाबू कवळेकर यांनी सकाळपासून आपल्या कार्यकर्त्यांसह सर्व मतदानकेंद्रांना भेट देऊन आपल्या समर्थक उमेदवारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. राज्‍यातील पंचायतींवरही भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्‍‍वास त्‍यांनी व्‍यक्त केला. दुसरीकडे आमदार डिकॉस्‍टा यांनी बाबू कवळेकर हे का म्‍हणून मतदानकेंद्रांवर फिरत होते, असा सवाल केला. पंचायत निवडणूक ही गावातील लोकांसाठी असून त्यांना हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा अधिकार आहे. म्‍हणूनच आपण या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. पण जे उमेदवार निवडून येतील ते माझेच असतील. कारण मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले आहे व सर्वांना समान वागणूक देणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित : विधानसभा निवडणुकीवेळी ज्‍येष्ठ नागरिक व अंथरुणावर असलेल्‍या रुग्‍णांसाठी त्‍यांच्‍या घरी मतदानाची सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. मात्र पंचायत निवडणुकीत त्यांना मतदानापासून वंचित राखल्याने त्यांचा एकप्रकारे मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे, असे फातर्पा पंचायत प्रभाग एकमधून निवडणूक लढणाऱ्या मारिया फर्नांडिस यांनी सांगितले.

मतदानाची टक्केवारी

  • आंबावली : ८३.२३

  • असोल्डा : ८२.०५

  • अवेडे चायफी : ७४.२८

  • बाळ्ळी : ८६.४८ बार्शे : ९०.४५

  • कावरे-पिर्ला : ८४.७८

  • फातर्पा किटला : ७९.३४

  • मळकर्णे : ८३.४९

  • मोरपिर्ला : ९१.१०

  • नाकेरी बेतूल : ७९.८०

  • शेल्डे : ७८.१०

  • एकूण ८२.७९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT