Antarctic Climate Change Dainik Gomantak
गोवा

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Antarctic Climate Change Study: या टीममध्ये वास्कोस्थित राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) येथील सात संशोधकांचा समावेश आहे.

Pramod Yadav

Antarctic Climate Change

वास्को: जग जागतिक हवामान बदलाचा सामना करत असताना, संशोधक अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा अभ्यास करणार आहेत. 60 दिवस चालणाऱ्या या अभ्यासात गोव्यातील संशोधकांची एक टीम सहभागी होणार आहे.

या टीममध्ये वास्कोस्थित राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) येथील सात संशोधकांचा समावेश आहे.

अंटार्क्टिका किनारपट्टीच्या बर्फाळ प्रदेशात होणाऱ्या या अभ्यासात तापमान, क्षारता, जैवविविधतेचे नमुने, महासागरातील परिसंचरणा, प्रदूषण पातळी आणि बर्फाचा थर याविषयी माहिती गोळा केली जाणार आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. ध्रुवीय क्षेत्र आणि भारतात होणाऱ्या पावसाचा NCPOR च्या वतीने अभ्यास करण्यात आला आहे. यानंतर हवामान बदलाचा अभ्यास केला जाणार आहे.

NCPOR च्या वरीष्ठ संशोधक शर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये मेलेना सोरेस, सुदर्शनराव पंडी, शर्मिला शेरिन, जीबनज्योती स्वैन, आंचल चौहान आणि गुलाम रब्बानी यांचा समावेश आहे. अभ्यासासाठी १० स्थानिक प्रयोगशाळा आणि दोन हेलिपॅड सज्ज करण्यात आले आहेत.

या संयुक्त अभ्यासासाठी ब्राझील, चिली, चीन, भारत, पेरु, रशिया, अर्जेंटीना आणि स्वीझरलँड या आठ देशातील ६१ संशोधक सहभागी होणार आहेत. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेला येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रिओ ग्रँड येथे जानेवारी २०२५ च्या अखेरीस जहाज माघारी येईल.

BRICS देशांसाठी अंटार्क्टिका क्षेत्रातील हवामान बदलाचा अभ्यास महत्वाचा असल्याचे वक्तव्य NCPOR च्या संशोधकांनी म्हटले आहे. अंटार्क्टिका किनारपट्टी क्षेत्रात जवळून होणारा हा पहिलाच अभ्यास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT