Goa Congress MLA
Goa Congress MLA Dainik Gomantak
गोवा

Breaking News|काँग्रेसला गोव्यात मोठं खिंडार; 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते आताच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपच्या वाटेवर जात आहेत. सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची माहीती गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान यांनी दिली होती.

(8 mla of goa congress reached assembly who may resign and join bjp latest news)

राज्य काँग्रेस पक्षाने येथील अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणूकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुस्किल असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देण्यात आला असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली.

येत्या दोन महिन्यात काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार - नजिर खान यांनी केला होता खुलासा

येणाऱ्या दोन महीन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक खुलासा नजिर खान यांनी केला. त्यांच्या समवेत अल्पसंख्याक विभागाचे साजिद खान,एलविनो अरावजो,बर्नाद फर्नाडीस उपस्थित होते.

राज्यातील जनतेने अकरा काँग्रेसचे आमदार निवडून दिले असताना सुध्दा पक्षातील आठ आमदार स्वार्थापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खुलासा देखिल खान त्यांनी पत्रकार परिषदेत केला. यामुळे भविष्यात काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचणार आहे. याला पुर्णपणे गोवा प्रदेश काँग्रेस जबाबदार असणार तसेच अध्यक्ष अमित पाटकर, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर नेते. गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याने आपल्या स्वार्थासाठी, या पक्षाचा फक्त आर्थिकरित्या उपयोग केला असल्याने केंद्रीय पदाधिकाऱ्यानी येथील पक्षावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नजिर खान यांनी केली आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान

सर्व धर्म पाळणारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला असल्याची माहीती गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष नजिर खान यांनी दिली आहे. राज्य काँग्रेस पक्षाने येथील अल्पसंख्याकाचा उपयोग फक्त विधानसभा निवडणूकीपूरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे मुस्किल असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देण्यात आला असल्याची माहीती नजिर खान यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT