Police
Police Danik Gomantak
गोवा

Goa Police: दक्षिणेत खुनाच्या घटनांत 72 टक्क्यांनी घट

गोमन्तक डिजिटल टीम

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दक्षिण गोव्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांत घट झाली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्‍या कालावधीत दक्षिण गोव्यात फक्त तीन खून झाले.

मागच्या वर्षी याच कालावधीत 11 खुनांची नोंद झाली होती. या दोन्हीं वर्षांची तुलना केल्यास यंदा खुनांचे प्रमाण 72 टक्क्यांनी घटले आहे.

दक्षिण गोव्यात एकूणच गुन्हेगारी घटनांमध्‍ये घट झाली आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्यांत 359 गुन्हेगारी प्रकरणे घडली. मागच्या वर्षी या पाच महिन्यांत हा आकडा 561 इतका होता. गुन्हेगारी प्रकरणांत मागच्या वर्षाच्या तुलनेत 36 टकक्‍यांनी घट झाल्याचे धनिया म्हणाले.

तपासाची सरासरी 99%

बलात्कारच्‍या सर्व प्रकरणांतील सर्व संशयित व पीडित या एकमेकांशी परिचित असल्याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. रस्तेअपघाताच्या 110 घटना घडल्या. त्यातील 109 प्रकरणांचा तपास लागला. तपासाची ही सरासरी 99 टक्के इतकी आहे. यंदा पाच महिन्यांत एकूण 600 जणांवर चाप्टर केसेस दाखल करण्यात आल्‍या. मागच्या वर्षी हा आकडा 408 इतका होता.

- अभिषेक धनिया, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT