Alemao Family At St. Xavier Exposition Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याला 70 लाख भाविकांनी लावली हजेरी, आता उरले केवळ 4 दिवस

Saint Francis Xavier Exposition:डिसेंबर २७ आणि २८ रोजी ओल्ड गोव्यात आलेल्या भाविकांची संख्या अधिक होती. या दिवशी ऊन असताना देखील रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Pramod Yadav

Saint Francis Xavier Exposition

ओल्ड गोवा: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याला आत्तापर्यंत ७० लाख भाविकांनी हजेरी लावली. हा आकडा ८० लाखापर्यंत जाण्याची शक्यता सोहळ्याचे उपाध्यक्ष मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दर्शनाचा वेळ देखील दोन तासांनी वाढवण्यात आला आहे.

दहा वर्षातून एकदा आयोजित होणारा संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळा २१ नोव्हेंबरपासून ओल्ड गोव्यात सुरु झाला. सोहळा सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर देशी - विदेशी पर्यटक आणि भाविक गोव्यात झेवियर यांचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत. अखेरच्या दिवसापर्यंत ८० लाख भाविक उपस्थिती लावतील असा अंदाज आहे.

"आम्ही काही टार्गेट सेट केलंय असं नाही. लोक स्वत:च येथे येत आहेत. ओल्ड गोव्यात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव नाही, झेवियर यांच्या भक्तीपोटी भाविक येतायेत. केवळ गोवाच नव्हे देश - विदेशातील भाविक आलेत," असे मंत्री सिक्वेरा म्हणाले.

डिसेंबर २७ आणि २८ रोजी ओल्ड गोव्यात आलेल्या भाविकांची संख्या अधिक होती. या दिवशी ऊन असताना देखील रस्त्यावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. लोकांचा ओघ कायम सुरु आहे, अशी माहिती सोहळ्याचे संयोजक हेनरी फाल्काव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

सोहळ्यापूर्वी ओल्ड गोव्यात सर्वत्र उघड्यावर फेकलेला कचरा पाहायला मिळत होता. दरम्यान, आता स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुढे देखील असाच स्वच्छ ठेवण्याचे आवाहन भाविक करतायेत.

उरले फक्त चार दिवस

२१ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याला आता केवळ चार दिवस उरले आहेत. ०५ जानेवारी रोजी या सोहळ्याची सांगता होईल. उरलेल्या दिवसात मोठ्या संख्येने भाविक गोव्यात झेवियर दर्शनासाठी हजर राहण्याची शक्यता आयोजक व्यक्त करतायेत. हा आकडा ८० लाखांपर्यंत जाईल, असे अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT