Arambol Illegal Construction Demolition  Dainik Gomantak
गोवा

CRZ चे उल्लंघन भोवले, हरमल बीच भागातील सात अवैध बांधकामांवर हातोडा; आठ बाकी

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: हरमल येथील समुद्रकिनारी सागरतटीय नियमन क्षेत्रात (सीआरझेड) उभारलेल्या बेकायदा बांधकामे हटविण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू असून बुधवारी आणखी तीन बांधकामे हटवण्यात आली. मंगळवारी चार बांधकामे हटवण्यात आली होती. येथील एकूण १५ बांधकामे हटवण्यात येणार आहेत.

सीआरझेड विभाग या सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू आहे. त्यानुसार १७ रोजी चार व १८ रोजी तीन बांधकामे मिळून एकूण सात बांधकामे आतापर्यंत हटवण्यात आली आहे. उर्वरित आठ बांधकामांवर कारवाई होणार आहे. दरम्यान, काहींनी स्वतः बांधकामे हटविण्याचा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

हरमल किनारी सीआरझेडचे उल्लंघन करून बेकायदा बांधकामे केल्याची अनेक तक्रारी असून या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने ही बेकायदा बांधकामे हटविण्याचे आदेश सीआरझेड उच्चाधिकार समितीला दिले होते. त्यानुसार ही बांधकामे हटवण्यात येत आहेत.

हरमल समुद्रकिनारी भागात सीआरझेड विभागाचे उल्लंघन करून समुद्रापासून २०० मीटरच्या आत जी बांधकामे केली होती, त्यावर मंगळवारपासून कारवाई करण्यास सुरवात केली होती. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) तीन बांधकामे पाडण्यात आली. एकूण १५ बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश सीआरझेड विभागाने दिला आहे.

वागातोर येथे पंचवीस बांधकामे पाडली

हणजूण कोमुनिदाद कमिटीने बुधवारी वागातोर येथे त्यांच्या जमिनीत बांधलेली सुमारे २५ बेकायदा बांधकामे पाडली. कोमुनिदादने यापूर्वी संबंधितांना ही जागा रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्याची पूर्तता न केल्याने पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई केली. हणजूण कोमुनिदादचे अध्यक्ष डॉमिनिक परेरा, म्हणाले की, आमच्या जागेत बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडली आहे.

अतिक्रमण केलेले धास्तावले

हरमल येथे सीआरझेडमध्ये उभारलेली काही बेकायदा बांधकामे हटविण्याची धडक मोहीम सुरू झाल्याने सीआरझेडमध्ये अतिक्रमण केलेले धास्तावले आहेत. हरमलमध्येच नव्हे तर पेडणेतील अन्य समुद्र किनाऱ्यांवरही सीआरझेडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याने ते प्रचंड धास्तावले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT