Kidnapping  Dainik Gomantak
गोवा

मेरशीतून पतीचं अपहरण, आरोपी पत्नीसह 6 जणांना बेड्या

जमीनविषयक आणि वैवाहिक वादातून अपहरण झाल्याची तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी : मेरशीतील एका व्यक्तीचं अपहरण केल्याप्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी तब्बल 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात त्या व्यक्तीच्या पत्नीचा हात असल्याचं उघड झालं आहे. विनायक देसाई असं या इसमाचं नाव असून जागेच्या वादातून हे अपहरणनाट्य रंगल्याचं चित्र आहे.

मेरशी कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या विनायक देसाई या 63 वर्षीय व्यक्तीचं मंगळवारी अपहरण करण्यात आलं होतं. देसाई यांना आरोपींनी दोना पावला येथील एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा ओल्ड गोवा (Old Goa) पोलिसांनी देसाई यांची सुटका करुन आरोपींना बेड्या ठोकल्या. आपल्या पत्नीसह सहा जणांनी अपहरण केल्याचा खुलासा पीडित विनायक देसाई यांनी केला आहे. जमीनविषयक आणि वैवाहिक वादातून अपहरण झाल्याची तक्रार देसाई यांनी दाखल केली आहे.

मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास मेरशी परिसरातून देसाई यांचं अपहरण (Kidnap) करण्यात आलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे अपहरणासाठी आरोपींनी देसाई यांचीच कार वापरली होती. यानंतर आरोपींनी देसाई यांना साखळीने बांधलं आणि दोना पावलामध्ये एका बंद फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं. देसाई यांना मारहाण झाल्याचंही पोलिसांनी (Police) स्पष्ट केलं आहे. देसाईंचं अपहरण होताना पाहून एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. आरोपींना सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: "इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा सखोल अभ्यास आधी करा!" राज्यातील नव्या इंधन धोरणावरून मागणी करत काँग्रेस आक्रमक

"निवृत्त कर्मचाऱ्याच्या 'ग्रॅच्युइटी'मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले पैसे तात्काळ परत करा!" गोवा मानवाधिकार आयोगाचा पेयजल विभागाला आदेश

Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

Chimbel: चिंबल पठारावरील 'ती' जागा पूर्ववत करा; ग्रामस्थांकडून सरकारला 7 दिवसांची मुदत, पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ठिणगी आता गोव्यात; पाठिंबा वाढल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव अधिक तीव्र

SCROLL FOR NEXT