Foreigners Deported Dainik Gomantak
गोवा

Goa: गुन्हेगारीत परदेशी नागरिकांचा सहभाग! गोव्यातून 650 फॉरेनर्सची हकालपट्टी

राज्यात कुठेही अवैध डान्सबार आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Yadav

गोव्यातील वाढते अवैध धंदे आणि गुन्हे यामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. याबाबत सरकार गंभीर असून याविरोधात सक्त कारवाई केली जात आहे. गोव्यातून बेकायदेशीपणे राहणाऱ्या आणि विविध गुन्ह्यात सहभाग अढळून आलेल्या 650 परदेशी नागरिकांची राज्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

(650 Foreigners staying without valid documents and involved in Crime in Goa are Deported)

"राज्यात वैध कागदपत्रे नसताना राहणाऱ्या तसेच विविध गुन्ह्यात सहभागी परदेशी नागरिकांची आम्ही माहिती घेत आहोत. अशा 700 नागरिकांची माहिती मिळाली असून, त्यापैकी 650 परदेशी नागरिकांची त्यांच्या मूळ देशात हकालपट्टी करण्यात आली आहे." अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. "नाताळ आणि नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर राज्यात विविध बिचवर मदत केंद्र उभारली जातील. तसेच, पोलिस नाकाबंदी देखील करणार आहेत." असे सावंत म्हणाले.

राज्यात डान्सबार नाहीतच!

राज्यात अवैध पद्धतीने डान्सबार सुरू असल्याचा वारंवार आरोप केला जातो. यावर प्रतिक्रिया देताना राज्यात डान्सबार नाहीतच असे उत्तर त्यांनी दिले आहे. राज्यात कुठेही अवैध डान्सबार आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी गाईड्स यांची नियुक्ती केली जाणार आहे. पर्यटन हंगामात पर्यटकांना मदत करण्यासाठी पोलिस तसेच होम गार्ड सदैव तत्पर असतील असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT