Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिण गोव्यात 6,22,391 मतदार

Goa Politics: दीपक देसाई: 18-19 वयोगटात 11हजार पेक्षा जास्त मतदार

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदार संघासाठीच्या एकवीसही मतदार संघांतील मतदारांची यादी 5 जानेवारी 2024 पर्यंत निश्र्चित झाली असून आज मतदार याद्यांची प्रत सर्व राजकीय पक्षांना देण्याचा कार्यक्रम दक्षिण गोवा जिल्हाधिकारी प्रशासन कचेरीत अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई व उपजिल्हाधिकारी प्रेमराज शिरोडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

मतदार याद्या देण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर नोंद झालेल्या सहा राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आले होते. यात कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, एनसीपी, गोवा फॉरवर्ड, आप व महाराष्ट्रवादी गोमंतक या पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र आज केवळ गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार याद्यांची प्रत घेतली.

जे पक्ष आले नाहीत, त्यांना सोमवारपासून त्यांच्या अधिकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कचेरीतूनही घेऊन जाता येईल. ५ जानेवारी २०२४ पर्यंत मतदार यादी निश्र्चित केली असून त्यामध्ये ६,२२,३९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आह, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिपक देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसभेसाठी दक्षिण गोव्यासाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यात ३०१५२५ पुरुष व ३२०८५८ महिलांचा समावेश आहे. शिवाय आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रेमराज शिरोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १५३८९ मतदार आहेत. यंदा एकूण १५४७२ नवोदित मतदारांची नोंद झाली आहे. असून त्यात ११ हजार पेक्षा जास्त १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांचा समावेश आहे.

उत्तर गोव्यात ‘प्रियोळ’

दक्षिण गोवा मतदारसंघासाठी २१ मतदार संघांची यादी तयार केली आहे. पण मतदानासाठी प्रियोळ हा मतदारसंघ उत्तर गोवा मतदारसंघात समाविष्ट होत असल्याने दक्षिण गोव्यात मतदानासाठी २० मतदार संघांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT