Goa News Dainik Gomantak
गोवा

कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे वृद्धाने गमावला जीव, 10 लाख नुकसान भरपाई मिळेपर्यंत ग्रामस्थ मागे नाही हटले

Goa News: सोमवारी आगाऊ रोख पाच लाख व उर्वरित पाच लाख दोन दिवसांनी देतो, असे कंत्राटदाराने सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

धारबांदोडा: मोले येथे रविवार ११ रोजी रात्री भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात राजू भट याचा बळी गेला. त्याची दुचाकी सरळ खड्ड्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बांबोळी येथे नेताना वाटेतच तो मृत्यू झाला.

सोमवारी ग्रामस्थांनी येथील प्रकरण हे गांभीर्याने घेतले व जोपर्यंत त्याला नुकसान भरपाई देणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कडक भूमिका घेतली. पोलिसांनी

मध्यस्थी करुन कंत्राटदार व ग्रामस्थ यांची चर्चा केली. तेव्हा ग्रामस्थांनी १५ लाखाची भरपाई मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना देण्यात यावी, अशी मागणी केली. तेव्हा कंत्राटदार पहिल्यांदा काहीही न बोलता गप्पच राहिला अखेर ग्रामस्थ खवळले, तेव्हा मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाख आपण नुकसान भरपाई देतो.

सोमवारी आगाऊ रोख पाच लाख व उर्वरित पाच लाख दोन दिवसांनी देतो, असे सांगितले. त्यानंतर राजू भट याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बंद घरात माय-लेकीचा मृतदेह; केपेत खळबळ, तीन दिवसांनी प्रकार उघड

राज्‍यात 'आयुष'साठी आता स्वतंत्र खाते, मंत्रिमंडळाची मंजुरी; आयुर्वेद, योगाला मिळणार चालना

गोव्यातील जमिनीवरून चरणजित चन्नी अडचणीत, पंजाब पर्यटन खात्‍याची जमीन कवडीमोल दराने भाडेपट्टीवर

Horoscope: अक्षय तृतीयेला बनतोय 'हा' दुर्मिळ राजयोग; लक्ष्मी देवीची 'या' 3 राशींवर विशेष कृपा, घरामध्ये येईल सुख-समृद्धी

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

SCROLL FOR NEXT