Gomant Bal Rath Dainik Gomantak
गोवा

Gomant Bal Rath : गोव्यात तब्बल 60 बालरथ ‘फिटनेस’विना रस्त्यावर

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बाल हक्क आयोगाकडून कारवाई करण्याचे निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Gomant Bal Rath : राज्यातील शैक्षणिक संस्थांना दिलेल्या 419 पैकी 60 बालरथांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपली आहे. तरीही ते रस्त्यांवर विद्यार्थ्यांना घेऊन धावत आहेत, अशी माहिती वाहतूक खात्यानेच बाल हक्क संरक्षण आयोगाने मागवलेल्या माहितीद्वारे उघड केली आहे. हा प्रकार धोकादायक असून विद्यार्थ्यांचा जिवावर बेतणारा आहे. यामुळे आयोगाने संबंधित शैक्षणिक संस्थावर त्वरित कारवाई करून सात दिवसांत त्याचा अहवाल मागवला आहे.

शाळांना देण्यात आलेल्या बालरथांनी फिटनेस परवाना प्रमाणपत्राचे नुतनीकरण केलेले नाही. काहींनी तर हे नुतनीकरण गेले दशकभर केलेले नसल्याप्रकरणाची बाल हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. 60 बालरथांचे फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याने पालकांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, वाहतूक समितीने शालेय बसेसची फिटनेस प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कंत्राट प्रवासी परमिट, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना, आग प्रतिबंधक उपकरणे तसेच प्रथमोपचार याची तपासणी करायला हवी. या समितीचे प्रमुख हे शाळेचे मुख्याध्यापक, पालक-शिक्षक संघटनेचा एक सदस्य, पोलिस इत्यादी असतात. समितीने प्रत्येक सत्राच्या तीन महिने अगोदर एकत्र जमून विविध प्रश्‍नावंर चर्चा करून तोडगा काढायला हवा.

बालरथांची तपासणी आवश्‍यक

मोटार वाहन कायद्याच्या कलम 2(47) नुसार प्रत्येक स्कूलबसला दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे सक्तीचे आहे. फिटनेस प्रमाणपत्रांशिवाय रस्त्यावर धावण्यास परमिट वाहतूक खाते देत नाही. असे असूनही काही बालरथ मुलांचा जीव धोक्यात घालून रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे या बालरथ बसेसविरोधात वाहतूक खात्याने कारवाई करावी, अशी विनंती आयोगाचे अध्यक्ष पीटर बॉर्जीस यांनी केली आहे.

बाल वाहतूक समितीचे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसकडे फिटनेस प्रमाणपत्र असल्‍याची शाहनिशा करण्यासाठी बाल वाहतूक समिती असणे सक्तीचे आहे. या समितीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच बस चालकांकडून आकारण्यात येणारे प्रवास शुल्क, बसथांबे याचे काम पाहणे आवश्‍यक आहे. मात्र, या समितीचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT