Goa Fishing Ban Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing Ban: एक जूनपासून मासेमारीस बंदी, पारंपारिक मच्छीमारांची आवराआवर सुरू

Goa Fishing Ban: गोव्यात 01 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी घालण्यात येते.

सुशांत कुंकळयेकर

Goa Fishing Ban

गोव्यात मॉन्सून एका आठवड्यावर येऊन ठेपलेला असताना पारंपारीक होड्यातून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारानीही आवराआवर सुरू करून आपल्या होड्या काठावर आणून ठेवण्यास सुरू केले आहे. कोलवा आणि बाणावली किनाऱ्यावर ही लगबग जाणवत होती.

01 जून पासून गोव्यात मासेमारी बंदी सुरू होणार असून यांत्रिकी बोटीतून मासेमारी करण्यास बंदी लागू होणार आहे ही बंदी 31 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता उठणार आहे.

ही बंदी पारंपरिक मासेमारीला लागू नसली तरी वादळी वाऱ्यात आपल्या होड्यांची नासधूस होऊ नये म्हणून त्या सुरक्षित ठिकाणीं ठेवण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती पेले फर्नांडीस यांनी दिली.

गोव्यात 01 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी घालण्यात येते. दोन महिन्यांच्या काळात मासेमारी बंदी असल्याने ट्रॉलर्सवर काम करणारे बहुतांश कामगार आपापल्या घरी परतात.

31 मेनंतर ट्रॉलर्समालकांना मच्छीमारी जेटीचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही, अशी माहिती मच्छीमारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT