Goa Police Postings  Dainik Gomantak
गोवा

Goa Police Postings: पोलिसांच्या पदांमध्ये मोठा बदल, गोव्यात ६ एसपींना नवीन जबाबदारी

Goa Police: गोवा राज्य सरकार कडून सहा पोलीस अधीक्षकांना (SP) नवीन पोस्टिंगचे वाटप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police new postings

पणजी: गोवा राज्य सरकार कडून सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी सहा पोलीस अधीक्षकांना (SP) नवीन पोस्टिंगचे वाटप करण्यात आले, यात तीन पोलीस अधिकारी असेही आहेत ज्यांना अलीकडेच पोलीस उपाधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदावरून बढती मिळाली होती. मिळालेल्या बढतीमध्ये दोन प्रोबेशनरी आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub Divisional Police Officers) पदावरून एसपी पदावर बढती देण्यात आली आहे.

प्रबोध शिरवाईकर यांना एसपी वाहतूक, हरिश्चंद्र मडकईकर यांना एसपी कोकण रेल्वे आणि संतोष देसाई यांना एन्टी करप्शन विभागाच्या व विशेष शाखेच्या एसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे पूर्व एसपी गुरुदास गावडे आता विधी आणि दक्षता विभाग (Legal and Vigilance department) पाहतील. एसपी नेल्सन अल्बुकर्क यांना भारतीय राखीव बटालियनच्या कमांडंटचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय तर स्पेशल ब्रांचचे एसपी र्मेश आंगले यांची पोलीस प्रशिक्षण शाळेचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

काणकोण आणि फोंडा येथे एसडीपीओ म्हणून काम पाहणाऱ्या अधिकारी अर्शी आदिल आणि टिकम सिंग वर्मा यांना इकॉनॉमिक ऑफेन्सिस सेल आणि अँटी-नार्कोटिक्स सेलची जबाबदारी सोपवण्यात आलीये तसेच आदिल यांच्याजवळ परप्रांतीयांच्या प्रादेशिक नोंदणी कार्यालयाचा भार दिला गेलाय. उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांच्याकडे आता एन्टी नार्कोटिक सेलची जबादारी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT