Panaji municipal corporation
Panaji municipal corporation  Dainik Gomantak
गोवा

पणजी मनपाचे बायो-मिथेनेशनचे 6 प्रकल्प पाणी-विजेपासून वंचित

दैनिक गोमन्तक

पणजी : मनपाने पणजी शहरात जैवविविध कचऱ्यावर प्रक्रिया करून 101 बायो-मिथेनेशनचे प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित झाले. परंतु त्यापैकी दहा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आणि त्यातील दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी चार प्रकल्प सुरू झाले आहेत; तर उर्वरित सहा प्रकल्पांना अद्याप वीज व पाण्याचे कनेक्शन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेले नाही. गेल्या दीड वर्षापासून मनपाचे कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी दोन कनेक्शन्स मिळवण्यासाठी हेलपाटे घालत आहेत; पण त्या कामाला यश येत नसल्याचे दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत साबांखाने हे कनेक्शन देण्याची पुन्हा एकदा मनपाला मुदत दिली आहे. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) सुरू केलेल्या इनोव्हेशन क्लीन टेक्नॉलॉजीस (आयसीटी) कार्यक्रमाचा बायो-मिथेनेशन प्रकल्प उभारण्याचा एक भाग आहे. मनपाने फ्लायकॅचर्स टेक्नॉलॉजी एलएलपीशी करार करून हे प्रकल्प राबवले आहेत. विविध ठिकाणच्या या प्रकल्पातून 5 हजार किलो जैवविविध कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायो-मिथेनेशन गॅस निर्मिती करणे आणि तो इतर व्यावसायिकांना पुरवठा करणे हा हेतू आहे. त्यासाठी महापालिकेने 11 ठिकाणी जागा निश्‍चित केल्या. त्यानुसार गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपूर्वी कचरा प्रकल्प उभारले. त्यापैकी चार ठिकाणचे प्रकल्प सुरू झाले; तर सहा ठिकाणचे प्रकल्प केवळ देखाव्यासारखे वाटू लागले आहेत.

सुरू असलेल्या चार प्रकल्पांतून 1100 किलो कचऱ्यावर नियमितपणे प्रक्रिया होत आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची जोडणीही अद्याप साबांखाकडून मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेला या प्रकल्पांसाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
सहा प्रकल्पांसाठी लागणारी वीज आणि पाणी यांची जोडणी देण्याचे काम साबांखाकडे आहे. त्या कामासाठी मनपा अधिकारी गेल्या कित्येक महिन्यांपासून हेलपाटे घालत आहेत. परंतु सरकारी काम आणि महिनाभर थांब, अशाप्रकारे सर्व काही सुरू आहे. सप्टेंबर महिन्याभरात वीज-पाणी कनेक्शन देण्याचे पूर्ण होईल, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे. कारण उर्वरित सहा प्रकल्पांतून सुमारे 3 हजार 900 किलो कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने तो कचरा मनपाला उचलून डेपोमध्ये न्यावा लागत आहे.

सुरू असलेले प्रकल्प व कचऱ्याची क्षमता (किलोग्रॅममध्ये)
1. गोवा राखीव पोलिस दल (आल्तिनो) परिसर - 150
2. गोवा पॉलिटेक्निक - 150
3. प्राण्यांचा निवारा (ॲनिमल शेल्टर) सांतइनेज - 500
4. पणजी महापालिका - 300

उभारलेले परंतु वीज व पाणी जोडणी नसलेले
1. कदंब बसस्थानक (बस पार्किंग व सुलभ शौचालयाजवळ)
2. मळा-नेवगीनगर (मलनिस्सारण टाकी उपसाजवळ)
3. एनआयडब्ल्यूएस मैदान (दोनापावला)
4. हिरा पेट्रोल पंपाजवळ (कदंब बसस्थानक परिसर)
5. सिने नॅशनल थिएटर
6. रोझ गार्डन (गीता बेकरीसमोर, प्रस्तावित प्रकल्प)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: शंकर पोळजींना 'राखणदार' होणे भोवले, हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी डिचोलीत तक्रार

Goa Live News Update: मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ

Rekha Jhunjhunwala: एका दिवसात गमावले 800 कोटी; रेखा झुनझुनवालांना कोणत्या कंपनीमुळे बसला फटका

South Goa : दक्षिणेतून भाजपचाच उमेदवार निवडून येईल! मंत्री रवी नाईक यांना विश्वास

Bicholim News : कासरपाल संदीपक शाळेसंदर्भातील आरोप तथ्यहीन : डॉ. चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT