6 arrested in goa for Ponda gang clash Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात दोन गटांमध्ये राडा; 6 जणांना पोलीस कोठडी

मंगळवारी रात्री या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती

आदित्य जोशी

फोंडा : फोंड्यात दोन गटांमध्ये नुकताच राडा पाहायला मिळाला होता. याप्रकणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली होती. आता यातील 6 जणांना दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी एका आरोपीवर उपचार सुरु असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.

फोंडा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सहा परप्रांतिय तरुणांना अटक केली होती. फोंड्यात झालेल्या दोन गटातील राड्यामध्ये या सर्वांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. आता पुढील तपासासाठी दंडाधिकाऱ्यांनी या सर्व सहा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मंगळवारी रात्री या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी एका गटातील इलाही मुनोहळी (26), मंजुनाथ चव्हाण 22, तौसिफ नदाफ 20 विशाल चव्हाण 22 यांना तर दुसऱ्या गटातील सादिक बादशाहसाब गजबीनवार 23 आणि साहिल रफिक शेख 18 या दोघांना अटक केली आहे. हे सर्वजण शापूर या फोंड्याजवळच असलेल्या परिसरात राहात असल्याची माहिती आहे. एका आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT