Raj Kapoor, Ranbir Kappor Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: 'इफ्फी'त रॉकस्टार! राज कपूर यांच्या आठवणींना 'रणबीर' देणार उजाळा, तारीख आणि वेळ जाणून घ्या

Goa IFFI 2024: 55 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) भारतीय चित्रपटसृष्टीतील महान शोमन म्हणून ठसा उमटवणाऱ्या राज कपूर यांच्या आठवणींना त्यांचा नातू तथा अभिनेता रणबीर कपूर उजाळा देणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2024 Goa Ranbir Kapoor In Conversation Session

पणजी: ५५ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) भारतीय चित्रपटसृष्टीतील महान शोमन म्हणून ठसा उमटवणाऱ्या राज कपूर यांच्या आठवणींना त्यांचा नातू तथा अभिनेता रणबीर कपूर उजाळा देणार आहे. ‘इफ्फी’च्या काळात २४ रोजी दुपारी अडीच ते ४ या वेळेत कला अकादमीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

रणबीर आपल्या आजोबांचे भारतीय चित्रपटसृष्टीत असलेले योगदान आणि त्यांचा समकालीन चित्रपटांचा वारसा नातू रणबीर कसा पुढे नेत आहे, यावर तो मते मांडणार आहे. या कार्यक्रमातून राज कपूर यांच्या कार्यांचे आणि जागतिक चित्रपटसृष्टीवरील त्यांच्या चिरस्थायी प्रभावावर प्रकाश पडणार आहे. राज कपूर, या वर्षी शताब्दी साजरी होत आहे, त्यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळ गाजली असल्याने आणि त्यांचा नातू आठवणींना उजाळा देणार असल्याने हा कार्यक्रम इफ्फीतील आकर्षण ठरणार आहे.

आवारा (१९५१), श्री ४२० (१९५५), संगम (१९६४), मेरा नाम जोकर (१९७०), बॉबी (१९७३) या सारख्या चित्रपटांचे ते निर्माता, दिग्दर्शक व अभिनेतेही राहिले. आकर्षक कथनातून सामाजिक-राजकीय समस्यांचे चित्रण करण्याची त्यांची क्षमता त्यांच्या चित्रपटातून दिसून येते. १९५१ मध्ये आलेल्या आवारा या चित्रपटाने सोव्हिएत युनियन आणि अनेक देशांमध्ये प्रचंड यश मिळवले. इतर देशांनी त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.

राज कपूर यांच्या योगदानावर चर्चा

राज कपूर यांच्या सिनेमॅटिक दृष्टिकोनाने अनेकदा सामाजिक वास्तववादाचे मनोरंजनासह मिश्रण केले. त्यांनी चित्रपटांतून गरिबी, सामाजिक विषमता, प्रेम आणि त्याग यासारख्या जटिल विषयांना हाताळले. ‘इफ्फी’तील इंटरॅक्शन सत्रात राज कपूर यांच्या अग्रगण्य कार्यांवर आणि जागतिक प्रतिमेत त्यांच्या योगदानावर चर्चा होणार आहे. भारतीय चित्रपट तज्ञ, इतिहासकार आणि सिनेप्रेमींना कपूर यांच्या कलात्मकतेवर चिंतन करण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 'कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही'; वाचा ठळक बातम्या

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

SCROLL FOR NEXT