Shariq Patel Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: 'पटकथा कशी विकावी याचे तंत्र माहिती असणे आवश्यक'; शरीक पटेलांनी सिनेनिर्मितीबद्दल दिला गुरुमंत्र

Shariq Patel At IFFI 2024: पटकथा निर्मात्याला कशी विकावी याचे तंत्र माहिती असणे आवश्यक असते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लेखकाने जिद्द सोडता कामा नये, असा सल्ला पटेल यांनी दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Shariq Patel IFFI 2024 The Art of Selling Your Script Master Class

मिलिंद म्हाडगुत

पणजी: कोणताही चित्रपट निर्माण करताना वा दिग्दर्शन करताना पटकथेचा अभ्यास करणे आवश्यक असते, असे प्रतिपादन सिनेनिर्माते-दिग्दर्शक तथा लेखक शरीक पटेल यांनी मनोरंजन संस्थेने खास गोमंतकीय सिनेकर्मींकरता आयोजित केलेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये केले. ते ‘आर्ट ऑफ सेलिंग युवर स्क्रिप्ट’ याविषयावर बोलत होते.

लेखकाने फक्त पटकथा लिहिली म्हणून होत नाही तर तिचे मार्केटिंग कसे करावे याची माहितीही लेखकाला असावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखकाला आपली पटकथा सशक्त आहे याचा आत्मविश्वास असायला हवा. हा आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. त्याचबरोबर पटकथा निर्मात्याला कशी विकावी याचे तंत्र माहिती असणे आवश्यक असते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लेखकाने जिद्द सोडता कामा नये, असा सल्ला पटेल यांनी दिला.

‘ओटीटी’बद्दल बोलताना पटेल यांनी ‘ओटीटी’वर आपली पटकथा देताना ती संपूर्ण द्यावी लागते. निर्माता वा दिग्दर्शकाला ही पटकथा देताना त्यातील बारकावे अधोरेखित करावे लागतात. पटकथा ही कोणत्याही निर्मितीची मूळ असल्यामुळे ती लिहिताना सर्व दृष्टीने विचार करावा लागतो. खासकरून सुरुवात आणि शेवट प्रभावी झाल्यास निर्मिती यादगार ठरू शकते, अशी अनेक चित्रपटांची उदाहरणे दिली.

सुरुवातीला मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो यांनी ‘मास्टर क्लास’चे रितसर उद्‌घाटन केले. ही गोमंतकीय सिनेकर्मींकरता चांगली संधी आहे. याचा फायदा त्यांना त्यांच्या निर्मितीत होऊ शकेल, अशी आशा लोबो यांनी व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक या ‘मास्टर क्लास’चे निमंत्रक शर्मद रायतुरकर यांनी केले.

गोमंतकीय सिनेकर्मींनी मांडल्या समस्या

यावेळी उपस्थित असलेल्या अनेक गोमंतकीय सिनेकर्मींनी त्यांना सतावणाऱ्या समस्या पटेल यांच्यासमोर मांडल्या. कोकणी चित्रपटांना मार्केट नाही इथपासून ‘ओटीटी’वर चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव दिल्यास ते गाजलेल्या कलाकारांची मागणी करतात, अशा समस्या मांडल्या.

एका महिला कलाकाराने तर झी स्टुडिओजने गोमंतकीय सिनेकलाकारांना संधी द्यायला हवी, अशी मागणी केली. यावर बोलताना पटेल यांनी धीर न सोडता स्थानिक सिनेकलाकारांनी सर्व माध्यमांवर प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT