Dainik Gomantak
गोवा

Sancoale: फ्लॅटमध्ये घुसून महिलेचा विनयभंग, 53 वर्षीय आरोपीला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

विरोध असूनही एका महिलेला व्हाट्सअप संदेशाद्वारे प्रेम, आपुलकी काळजी दाखवण्याचा 53 वर्षी पुरुषाला महागात पडले आहे. सांकवाळ (Sancoale) येथील झुआरी नगर (ZuariNagar) येथील महिलेच्या फ्लॅटमध्ये घुसून विनयभंग केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी (Verna Police) गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झुआरी नगर सांकवाळ येथील मनोज नाईक नावाचा आरोपी एका महिलेला व्हाट्सअप संदेशाद्वारे प्रेम, आपुलकी दाखवत होता. याचा त्या महिलेच्या विरोध असतानाही तो वारंवार तिला व्हाट्सअप द्वारे संदेश पाठवत होता. दरम्यान त्या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 354(D), 354, 323, 448, 504, 506 (ii) अन्वये त्याला अटक करण्यात आली.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपीने 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वा. महिलेचा पाठलाग केला. पुढे आरोपी व्यक्तीने फिर्यादी व तिच्या नातेवाईकावर प्राणघात हल्ला करण्याच्या उद्देशाने लोखंडी रोडने सशस्त्र तक्रारदार महिलेच्या फ्लॅटमध्ये गुन्हेगारी पद्धतीने घुसखोरी केली. पुढे आरोपीने महिलेचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचले आणि नातेवाईकाने त्याला अडवून प्रत्युत्तर दिल्यावर आरोपींनी फुलदाणी वर केली व महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आरोपीने त्यांना गंभीर परिणाम भोगल्याची धमकीही दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिमे पुरुषकर हे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियास यांच्या देखरेखाली करत आहेत.

दरम्यान आणखी एका घटनेत वेर्णा पोलिसांनी सुआरी नगर येथील रहिवाशी संतोष पडणकट्टी (25) याला मारहाण केल्याप्रकरणी झुआरी नगर येथील रामगोपाल यादव या (42) वर्षीय व्यक्तीला अटक केली.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला झुआरी नगर येथील रहिवासी संतोष पडणकट्टी (25) यांच्या तक्रारीवरून यादवाला आयपीसी कलम 323, 504, 506 (ii) अंतर्गत अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री आरोपीने फिर्यादी संतोष याला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. कॉन्स्टेबल उमेश नाईक पुढील तपास करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलीसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

SCROLL FOR NEXT