Chicalim SDH: चिखली उपजिल्हा इस्पितळात कर्मचाऱ्यांअभावी नाव नोंदणी काउंटरवर रुग्णांची हेळसांड

Chicalim SDH: चिखली उपजिल्हा इस्पितळात कर्मचाऱ्यांअभावी नाव नोंदणी काउंटरवर रुग्णांची हेळसांड
Published on
Updated on

चिखली उपजिल्हा इस्पितळात (Chicalim Sub District Hospital) कर्मचाऱ्याअभावी नाव नोंदणी काउंटरवर रुग्णांची हेळसांड होत आहे. बायणा येथील आरोग्य तपासणी केंद्र बंद असल्याने मुरगाव मतदार संघातील रुग्णांचा अतिरिक्त ताण उपजिल्हा इस्पितळावर पडत आहे. बायणातील आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी येथील लोकांकडून होत आहे.

चिखली येथे सुसज्ज उपजिल्हा इस्पितळाचे लोकार्पण करून चार वर्षे उलटली. सुरुवातीला साधन, सुविधा, डॉक्टर्स व इतर कर्मचारी अभावामुळे सदर इस्पितळ चर्चेत होते. आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी आणखी त्रुटी या इस्पितळात जाणवत आहे. इस्पितळात तपासणीसाठी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याचे मुख्य कारण म्हणजे, मुरगांव मतदार संघातील बायणा येथे रवींद्र भवन शेजारी असलेले आरोग्य केंद्र अजून बंद स्थितीत आहे. या आरोग्य केंद्राचा बायणा, देस्तेरो, सडा व इतर भागातील लोकांना बऱ्यापैकी उपयोग व्हायचा. चिखली येथील उपजिल्हा इस्पितळाचे लोकार्पण झाल्यापासून बायणा येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर्स येत नसल्याने येथील लोकांचे बरेच हाल होत आहे.

Chicalim SDH: चिखली उपजिल्हा इस्पितळात कर्मचाऱ्यांअभावी नाव नोंदणी काउंटरवर रुग्णांची हेळसांड
...अन्यथा कोविड लस शेजारच्या राज्यांमध्ये हस्तांतरित कराव्या लागतील

एखादा रुग्ण तापाने फणफणत असल्यास, तसेच गर्दी झाल्यास त्याला सात किलोमीटर अंतर कापून चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात जावे लागते. तोपर्यंत त्या रुग्णाची हालत आणखी खराब होते. एक तर त्याला दोन बस पकडाव्या लागतात, त्याही वेळेवर नसतात. दुसरे म्हणजे 200 ते 300 रुपये खर्चून चिखली उपजिल्हा इस्पितळ गाठावे लागते. तेथे गेल्यानंतर नाव नोंदणी करण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहावे लागते. आजारी असल्याने उभे राहण्याच्या परिस्थितीत नसल्याने त्याला तासांतास इस्पितळात घालावा लागतो. तसेच नाव नोंदणी काउंटरवर कर्मचाऱ्यांच्या अभावी नाव नोंदणी करण्यासाठी उभे राहिलेल्या रुग्णांची लांबच्या लांब रांग लागते.

इस्पितळात बायणा व इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांचा अतिरिक्त ताण पडत असल्याने नाव नोंदणी काउंटर लहान पडत आहे. या काउंटर वर एक पुरुष, एक महिला तसेच वृद्धांसाठी मिळून तीन रांगा लागतात. मात्र कर्मचारी नाव नोंदणी करून घेण्यासाठी दोनच असल्याने रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळे तासंतास रांगेत उभे राहून रुग्णांची हालत बेकारीची होते. दरम्यान या ठिकाणी नाव नोंदणी अतिरिक्त काउंटर उभारण्यात यावा अशी मागणी होत आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बायणा येथील आरोग्य केंद्रात नियुक्त केलेले डॉक्टर्स व इतर कर्मचारी रुग्णांची या ठिकाणी सेवा करायला येण्यास टाळाटाळ करतात. चिखली येथील इस्पितळ वातानुकूलित असल्याने त्यांनी या ठिकाणी सेवा देण्यास टाळाटाळ केल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. जर चिखली येथील इस्पितळातील रुग्ण संख्येचा ताण कमी करायचा असेल तर बायणा येथील आरोग्य केंद्र कार्यान्वित करणे गरजेचे आहे. याची मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर दाखल घेऊन बायणा येथील आरोग्य केंद्र कार्यान्वित करावे अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com