Government Jobs Dainik Gomantak
गोवा

Government Jobs: केंद्र सरकारच्या विविध विभागांत 53 गोमंतकीयांना नोकरी; रोजगार मेळाव्यातून नियुक्ती

Goan Youth Central Government Jobs: केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये गोव्यातील ५३ युवक-युवतींची नियुक्ती झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि आस्थापनांमध्ये गोव्यातील ५३ युवक-युवतींची नियुक्ती झाली. देशभरात आयोजित करण्यात आलेल्या २० व्या रोजगार मेळाव्याचा भाग म्हणून पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील रोजगार मेळाव्यांना संबोधित करताना विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या युवक-युवतींशी संवाद साधला. देशभरातील रोजगार मेळाव्यांमध्ये ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

पणजीतील रोजगार मेळाव्याचे आयोजन केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि सीमाशुल्क आयुक्तालयातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि सीमाशुल्क विभागाचे आयुक्त सुबोध सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, नवनियुक्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

नियुक्तीपत्रे प्रदान करताना श्रीपाद नाईक यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सरकारी नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून नागरिकांची सेवा करण्याची आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांनी आपली कौशल्ये सातत्याने विकसित करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पायाभूत सुविधा, बँकिंग, रेल्वे, विमान वाहतूक, शिक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांतील तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विविध विभागांत नियुक्ती

नवनियुक्त ५३ युवक-युवतींना बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, टपाल विभाग, रेल्वे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सीमाशुल्क विभाग तसेच गोवा भारतीय तंत्रज्ञान संस्थेसह विविध केंद्रीय सरकारी आस्थापनांमध्ये नियुक्ती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MGP BJP Alliance: 'सन्मान मिळाला तरच युती कायम'; भाजपला सत्ता हवी असेल तर मगोपला सोबत घ्यावेच लागेल, सुदिन ढवळीकरांचा इशारा

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने रचला इतिहास! महिला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी ठरली जगातील पहिली फलंदाज; सूजी बेट्सला पछाडले

Goa Politics: 'जनतेच्या नावावर राजकीय मागणी लादू नका'; विरोधकांच्या ऐक्याच्या भूमिकेवर भाजपचा माणिकराव ठाकरे यांच्यावर निशाणा

8th Pay Commission: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! CGHS हेल्थ स्कीमचे बदलले नियम; देशभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Goa Congress: पाटकर-विरियातोंची काँग्रेस समितीच्या बैठकीकडे पाठ; समित्यांमध्ये स्थान देऊनही मनधरणी करण्यात नेतृत्वाला अपयश

SCROLL FOR NEXT